कल्याणच्या दूधनाक्यावर १० हजार लिटर दुधाची विक्री
By admin | Published: March 8, 2016 01:55 AM2016-03-08T01:55:38+5:302016-03-08T01:55:38+5:30
दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील दूधनाक्यावर सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त तब्बल १० हजार लिटर दुधाची विक्री झाली. शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर दुधाची खरेदी केली.
कल्याण : दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील दूधनाक्यावर सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त तब्बल १० हजार लिटर दुधाची विक्री झाली. शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर दुधाची खरेदी केली. मागणी
वाढल्याने येथे दुधाला प्रतिलिटर ५०
ते ५२ रुपये प्रति लिटरचा भाव मिळाला, अशी माहिती दूधविक्रेत्यांनी दिली.
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो. त्यामुळे सोमवारी दुधाची मागणी वाढली. त्यातुलनेत दुधाची आवकही चांगली झाली. कल्याणमधील दुधाचे मोठे व्यापारी व जाणकार शरफुद्दीन कर्ते यांनी सांगितले, की ‘उन्हाचा तडाका वाढला आहे. उन्हाळ््यात चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्याअभावी जनावेर दूध कमी देतात. परिणामी उत्पादनात घट येते.
यंदा उन्हाळ््याला आता सुरुवात होत आहे. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात फारशी घट दिसत नाही. बाजारात जवळपास १० हजार लिटर दुधाची विक्री झाली. मागणीच्या तुलनेत दुधाचा दर जास्त नव्हता. येथील बाजारात दुधाला जास्तीच जास्त ६० रुपये लिटर भाव मिळतो.
मात्र सोमवारी तो भाव विक्रेत्यांना मिळाला नाही. खुल्या दूध विक्रेत्यांना प्रति लिटरला ५० ते ५२ रुपये भाव मिळाला. २०० पेक्षा जास्त दूध विक्रेते दूधनाक्यावर दूधविक्री करतात. त्यातून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होते. (प्रतिनिधी)