भूखंडाची विक्री, सीईटीपी प्लॅण्ट केला भुईसपाट

By admin | Published: November 24, 2015 01:39 AM2015-11-24T01:39:40+5:302015-11-24T01:39:40+5:30

तारापूर एमआयडीसीमधील ओ २३/१ या प्लॉटवर जागतिक बँकेच्या साहाय्याने उभारलेल्या देशातील पहिल्या व ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या दोन एमएलडी

Sale of land, CETP planted groundnut | भूखंडाची विक्री, सीईटीपी प्लॅण्ट केला भुईसपाट

भूखंडाची विक्री, सीईटीपी प्लॅण्ट केला भुईसपाट

Next

पंकज राऊत, बोईसर
तारापूर एमआयडीसीमधील ओ २३/१ या प्लॉटवर जागतिक बँकेच्या साहाय्याने उभारलेल्या देशातील पहिल्या व ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या दोन एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या प्लँट विक्रीला टीमा-सीईटीपी को-आॅप. सोसायटीने विरोध करूनही त्याला न जुमानता या प्लॉटमधील २० हजार स्क्वेअर मीटरपैकी १७ हजार स्क्वेअर मीटर प्लॉट दोन उद्योगांना एमआयडीसीने विकले असून त्या उद्योगांनी सीईटीपीचा प्रकल्पही जमीनदोस्त केला
आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता २६ आॅगस्ट १९९२ ला अ‍ॅमेनिटी भूखंड क्र. ५० (भूखंड क्र. ओ-२३ (१) पार्ट) च्या मधील २० हजार चौरस मीटर जागा एमआयडीसीकडून घेऊन त्या भूखंडावर औद्योगिक क्षेत्रातील २४८ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजने टीमा-सीईटीपी को-आॅपरेटिव्ह सोसायटी बनवून सुमारे एक कोटी आठ लाख खर्चून १७ आॅगस्ट १९९४ ला प्रथम एक एमएलडी क्षमतेचे सामुदायिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्र सुरू केले. त्याकरिता, जागतिक बँकेकडून ६० लाखांचे कर्जही घेतले होते, तर १९९९ साली त्या प्रकल्पाची आणखी एक एमएलडीने क्षमता वाढवून ती दोन एमएलडी करण्यात आली. त्यामुळे या प्रकल्पाची एकूण सुमारे पाच कोटी प्रोजेक्ट कॉस्ट झाली होती. त्यामध्ये सरकारकडून सबसिडी सुमारे ७० लाख रुपये मिळाली होती.
२५ एमएलडी क्षमतेचे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर २००८ नंतर तारापूर एमआयडीसी पालघर, डहाणू व तलासरी आदी भागांतील स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील सॉलीड वेस्ट एकत्र करून तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला पाठविण्यात येत होते. तर, २५ एमएलडी सीईटीपी म्हणजेच पर्यावरणरक्षणासंदर्भातच करण्यात येत होता. तारापूर एमआयडीसीमधील कंपनीकरिता उपयुक्त असे इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर सुरू करण्याच्या विचारात टीमा-सीईटीपी सोसायटी होती.अशा पर्यावरणासंदर्भातच अ‍ॅक्टिव्हिटी ०-२३/१ या प्लॉटवर सुरू असतानाच अचानक ११ व १४ फेब्रुवारी २०१४ या दोन दिवशी एमआयडीसीने टीमा-सीईटीपी को-आॅप सोसायटीला पत्र पाठवून प्लॉट क्र. अ‍ॅमेनिटी भूखंड क्र. ५० (भूखंड क्र. ओ-२३(१) पार्ट क्षेत्र २०००० चौ.मी. व अ‍ॅमेनिटी भूखंड क्र. ४९ (भूखंड क्र.ओ-२३ (१) पार्ट) क्षेत्र ५००० चौमी भूखंड आता म.औ. विकास महामंडळास आवश्यक असल्यामुळे हे भूखंड परत करून दोन्ही भूखंडांच्या मूळ ताबा पावत्या प्राथमिक करारनाम्याच्या मूळ प्रती तसेच अंतिम करारनामा प्रत इत्यादी दस्तऐवज एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात परत करावे, असे त्या पत्रात नमूद केले होते.
या पत्राला टीमा सीईटीपी को-आॅप. सोसायटीने एमआयडीसीला प्रथम उत्तर दिले. त्यानंतर, तीन स्मरणपत्रेही पाठविली. परंतु, एकाही पत्राचे उत्तर हे दोन्ही प्लॉट टीमा सीईटीपी को-आॅप. सोसायटीने पालघर जिल्हा न्यायालयाकडून प्लॉटवरील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे स्थगिती आदेश मिळवून ते एमआयडीसीकडे सुपूर्दही केले. मात्र, पूर्वीच त्या प्लॉटवरील सीईटीपीचा २ एमएलडीचा प्रकल्प जमीनदोस्त करण्यात आला आहे.

Web Title: Sale of land, CETP planted groundnut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.