उल्हासनगरात पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅगची विक्री, ७ जणा विरोधात गुन्हा

By सदानंद नाईक | Published: January 12, 2023 07:12 PM2023-01-12T19:12:13+5:302023-01-12T19:12:20+5:30

 कॅम्प नं-३ पवई चौकातील दुकानात पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅग विकत असल्या प्रकरणी पोलिसांनी धाड टाकून ७ लाख ७३ हजाराचा बॅग जप्त केल्या. याप्रकरणी ७ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Sale of fake bags of Puma and Skybag company in Ulhasnagar, crime against 7 people | उल्हासनगरात पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅगची विक्री, ७ जणा विरोधात गुन्हा

उल्हासनगरात पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅगची विक्री, ७ जणा विरोधात गुन्हा

googlenewsNext

उल्हासनगर - कॅम्प नं-३ पवई चौकातील दुकानात पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅग विकत असल्या प्रकरणी पोलिसांनी धाड टाकून ७ लाख ७३ हजाराचा बॅग जप्त केल्या. याप्रकरणी ७ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील पवई चौकातील बॅग मार्केट मधील काही दुकानात पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅग विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी काही दुकानावर धाड टाकून ७ लाख ७३ हजार ३९० रुपये किंमतीच्या पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅग जप्त केल्या. दुकानदार पुमा व स्कायबॅग कंपनीचे बनावट टॅग, लोगो लावून बॅगची विक्री करून ग्राहक व कंपनीची फसवणूक केली. दिलीपकुमार राधेश्याम स्वर्णकार, दीपक सचदेव, संजयकुमार शहा, सुनीलकुमार शहा, कुणाल गांधी, अनिलकुमार दास, मोहन रामचंदानी व जयप्रकाश दुसेजा यांच्यावर भांदवी कलम ४२०, सहकॉपीराईट, १९५७ चे कलम ५१, ५३ सह ट्रेडमार्क कलाम १०२ प्रमाणे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

शहरातील पवई चौक येथील बॅग मार्केट मध्ये नामांकित कंपनीच्या बॅगची विक्री करून नागरिक व कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले. उल्हासनगर मधील अनेक दुकानात नामांकित कंपनीच्या बनावट साहित्य विकल्या जात असल्याचे, यापूर्वीही उघड झाले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sale of fake bags of Puma and Skybag company in Ulhasnagar, crime against 7 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे