उल्हासनगरात नामांकित कंपनीच्या बॉटलमध्ये रिया दारूची विक्री; गुन्हा दाखल 

By सदानंद नाईक | Published: June 28, 2023 04:52 PM2023-06-28T16:52:40+5:302023-06-28T16:52:53+5:30

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Sale of Rhea liquor in bottles of reputed company in Ulhasnagar; Filed a case | उल्हासनगरात नामांकित कंपनीच्या बॉटलमध्ये रिया दारूची विक्री; गुन्हा दाखल 

उल्हासनगरात नामांकित कंपनीच्या बॉटलमध्ये रिया दारूची विक्री; गुन्हा दाखल 

googlenewsNext

उल्हासनगर : कॅम्प नं-४ श्रीराम चौकातील राखी बार मध्ये रॉयल स्टेग, इम्पेरियल ब्ल्यू आदी नामांकित कंपनीच्या रिकाम्या बॉटल मध्ये रिया दारूची विक्री केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-४, श्रीराम चौकातील राखी बार अँड रेस्टॉरंट मध्ये रिकाम्या बॉटल मध्ये रिया दारू भरून बॉटलला रॉयल स्टेग, इम्पेरियल ब्ल्यू कंपनी आदी नामांकित कंपनीचे लेबल लावून सील केल्या जात होत्या. रिया दारूने भरलेल्या रॉयल स्टेग व इम्पेरियल ब्ल्यू दारू म्हणून विक्री करीत असल्याचा प्रकार मंगळवारी उघड झाला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात प्रवीण कुमार नायर यांच्या तक्रारी वरून विनीत घोष व विभा अनिल तायवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sale of Rhea liquor in bottles of reputed company in Ulhasnagar; Filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.