व्हॅलेंटाईन डेला घटली कार्डांची विक्री

By admin | Published: February 15, 2017 04:22 AM2017-02-15T04:22:19+5:302017-02-15T04:22:19+5:30

एकेकाळी विविध वस्तूंच्या खरेदीने गाजणारा व्हॅलेंटाइन डे सोशल मिडीयामुळे पार बदलून गेला आहे. गुलाबाची फुले, भेटकार्डे

Sales of Deleted Cards for Valentine's Day | व्हॅलेंटाईन डेला घटली कार्डांची विक्री

व्हॅलेंटाईन डेला घटली कार्डांची विक्री

Next

जव्हार : एकेकाळी विविध वस्तूंच्या खरेदीने गाजणारा व्हॅलेंटाइन डे सोशल मिडीयामुळे पार बदलून गेला आहे. गुलाबाची फुले, भेटकार्डे यांचे यावेळी त्यामुळे विक्रीचे प्रमाण खूपच घटले आहे.
गुलाबाचे फुल, भेट वस्तुंमध्ये ग्रिटींग्ज कार्डस तसेच विविध प्रकारचे लव शोपीस, आवड निवडीच्या वस्तूंची जागा सध्या व्हॉटसअ‍ॅप व फेसबुकनी घेतली असुन आता तरूणाई जास्तीत जास्त व्हॉटस अ‍ॅप व फेसबुकद्वारे होणाऱ्या सेलिब्रेशनला महत्व देते आहे. त्यामुळे आता सोशल मिडीया द्वारे जगात कधीही कुठेही कुठल्याही डेच्या शुभेच्छा अवघ्या सेकंदात दिली जात आहे, त्यामुळे या भेट वस्तूंची देवाण घेवाण खुपच कमी झाले आहे.
मागील सात ते आठ दिवसांपासून वेगवेगळया स्वरुपाचे डे ज महाविदयालयात चालू असतांना, आजची तरुण पिढी ही व्हॅलेंन्टाईन डे हा आगळया वेगळया प्रकारात साजरा करते आहे. प्रत्येक तरुणाईचा अतिशय आवडता विषय प्रेम बनला असला तरी सोशल मिडीयाला अधिक पसंती देत आहे. मात्र पूर्वीसारखे फुगे, गुलाबाचे फुल, ग्रिटींग कार्डस इत्यादी देण्यापेक्षा इंतरनेटच्या माध्यमांतून व सोशल मिडीयाच्या वापरातून तो साजरा करण्यास आजची तरुणाई पसंत करते आहे. आपापल्या जोडीदारास काय हवे काय नको हे माहीत करून बरयाचशा आॅनलाईन खरेदी व विक्री करणे व त्यासाठीचे सर्व पर्याय व स्वातंत्र्य तरूणाईस उपलब्ध असल्याने ती त्याकडे आकर्षित झाली असून माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने अँड्राईड फोन तसेच स्मार्ट फोन्सच्या मदतीने प्रेम भावना व्यक्त करणे, या गोष्टींकडे तरूणाई वळल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Sales of Deleted Cards for Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.