दोन कोटींचा विक्री कर बुडवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:10 AM2017-07-19T01:10:11+5:302017-07-19T01:10:11+5:30
मालाच्या खरेदी-विक्रीची बोगस कागदपत्रे विक्री कर विभागास सादर करून सुमारे २ कोटी रुपयांचा विक्री कर बुडविणाऱ्या ठाण्यातील दोघांविरुद्ध कोपरी पोलिसांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मालाच्या खरेदी-विक्रीची बोगस कागदपत्रे विक्री कर विभागास सादर करून सुमारे २ कोटी रुपयांचा विक्री कर बुडविणाऱ्या ठाण्यातील दोघांविरुद्ध कोपरी पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.
ठाण्यातील वल्लभ चिकालिया आणि सुरेश उगरेज यांनी कोपरीतील सिद्धार्थ नगरात गोकूळधाम हाउसिंग सोसायटीच्या पत्त्यावर मे. चंदन केमिकल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणी विक्री कर विभागाकडे केली होती. विक्री कर विभागाचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर मालाची प्रत्यक्ष खरेदी-विक्री न करता खोटी बिले बनवली. ही बिले इतर व्यापाऱ्यांना दिल्याने त्यांना बिलामध्ये नमूद कराची वजावटी विक्री कर विभागाकडून घेण्यास आरोपींनी मदत केली. २0१0 ते २०११ आणि २0११ ते २०१२ या दोन वर्षांत आरोपींनी अशा प्रकारे विक्री कर विभागास तब्बल २ कोटी १२ लाख ३९ हजार ६८ रुपयांचा चुना लावला. सहायक विक्री कर आयुक्त आय.एम. पवार यांच्या तक्रारीवरून कोपरी पोलिसांनी या दोन्ही संचालकांविरुद्ध मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. विक्री कर विभागाकडे आरोपींनी नोंदणी केलेल्या कंपनीच्या पत्त्यावर कुणीही उपलब्ध नसल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपींनी पत्ताही कदाचित खोटा दिला असावा, असे
अशोक सावंत यांनी सांगितले.