भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी समाजवादीचे आमदार रईस शेख रस्त्यावर

By नितीन पंडित | Published: December 5, 2023 07:10 PM2023-12-05T19:10:40+5:302023-12-05T19:15:59+5:30

वाहतूक पोलिसांना १०० बॅरिकेड्सची भेट

Samajwadi MLA Raees Sheikh on the road to solve the traffic jam in Bhiwandi | भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी समाजवादीचे आमदार रईस शेख रस्त्यावर

भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी समाजवादीचे आमदार रईस शेख रस्त्यावर

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरात वाहतूक कोंडी समस्या गंभीर बनली असून शहरात अवजड वाहनांसह अनेक वाहन वाहतूक नियमां कडे दुर्लक्ष करून रस्त्यावर धावत असल्याने शहरांतर्गत सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य जनतेसह वाहन चालकांना करावा लागत आहे. या समस्येवर उपाययोजनांसाठी भिवंडी पूर्वचे समाजवादीचे आमदार रईस शेख हे पुढे सरसावले असून त्यांनी मंगळवारी मुलायम सिंह युथ ब्रिगेडच्या वतीने भिवंडी वाहतूक पोलिसांना १०० प्लास्टिक बॅरिकेट्स भेट दिली.

ही भेट दिल्या नंतर रईस शेख व वाहतूक पोलिसांनी बेशिस्त मोटरसायकल चालवणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.तर भिवंडी वाहतूक शाखा वतीने जनतेला वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी वाहतूक विभाग भिवंडी शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील व शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कुंभार व समाजवादी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Samajwadi MLA Raees Sheikh on the road to solve the traffic jam in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.