महाविकास आघाडीमधून २५ जागांवर संभाजी ब्रिगेड करणार दावा; विधानसभेसाठी तयारी

By जितेंद्र कालेकर | Published: August 18, 2024 07:38 PM2024-08-18T19:38:58+5:302024-08-18T19:39:38+5:30

याच बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. मनाेज आखरे यांनी माहिती दिली. त्यावेळी ते बाेलत हाेते.

Sambhaji Brigade will claim 25 seats from Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीमधून २५ जागांवर संभाजी ब्रिगेड करणार दावा; विधानसभेसाठी तयारी

महाविकास आघाडीमधून २५ जागांवर संभाजी ब्रिगेड करणार दावा; विधानसभेसाठी तयारी

ठाणे: महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून संभाजी ब्रिगेड आगामी विधानसभेसाठी २५ जागांसाठी आग्रह धरणार आहे. येत्या २३ ऑगस्ट राेजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यार्चा मेळावा हाेणार आहे. मेळावा आणि विधानसभा निवडणुकीसाठी संघटनेच्या बांधणीसाठी ठाण्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयाेजन केले हाेते. याच बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. मनाेज आखरे यांनी माहिती दिली. त्यावेळी ते बाेलत हाेते.

आखरे यांनी ठाण्यातील विश्रामगृहावर रविवारी एका बैठकीचे आयाेजन केले हाेते. यावेळी ते म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह काेकणात सध्या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. त्यासाठी संघटनेची बांधणी केली जात आहे. पुण्यात येत्या २३ ऑगस्ट २०२४ राेजी लाेकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे. यासाठी राज्यभरातून पाच ते दहा हजार कार्यकतेर् येणार आहेत. ताे यशस्वी करण्यासाठी आखरे यांनी ठाण्यात ही बैठक घेतली हाेती. याच बैठकीमध्ये त्यांनी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे.

मात्र, शिवसेना उबाठा गाेटातून आपण किमान २५ जागांसाठी आग्रही राहणार असल्याचे ते म्हणाले. संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेले राज्यभरात सध्या १७ ते १८ आमदार असल्याने आपण जास्तीज जास्त जागा निवडून आणू शकताे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. २०२४ लाेकसभा निवडणूकीतही महाविकास आघाडीमधून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यात संभाजी ब्रिगेडची भूमीका महत्वाची ठरली. भांडवलशाहीला हादरा देण्याचे आणि संविधान बचावाचेही काम केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्याच विचारधारेची माणसे निवडून गेली पाहिजेत. यासाठी संघटनेची बांधणी करण्यात येत असल्याचेही आखरे यावेळी म्हणाले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: Sambhaji Brigade will claim 25 seats from Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.