हिंदुद्वेषाविरोधात सनातनची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:44 AM2018-08-21T03:44:06+5:302018-08-21T03:44:30+5:30
हिंदुत्ववाद्यांवर पुरोगाम्यांचे हत्यांचे खोटे आरोप करून बंदीची मागणी करणाऱ्यांविरोधात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी येथील जांभळीनाका चौकात सोमवारी सायंकाळी निदर्शने केली.
ठाणे : हिंदुत्ववाद्यांवर पुरोगाम्यांचे हत्यांचे खोटे आरोप करून बंदीची मागणी करणाऱ्यांविरोधात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी येथील जांभळीनाका चौकात सोमवारी सायंकाळी निदर्शने केली. यादरम्यान विविध घोषणा देऊन पुरोगाम्यांच्या तालावर नाचणाºया शासनाचा धिक्कार करणारे फलकही यावेळी कार्यकर्त्यांनी झळकावले.
उपस्थितांना मार्गदर्शन करणाºया प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांवर चुकीच्या प्रचाराचा व प्रसिद्धीचा आरोप केला. सुधारकपणाचा आणती आव... सतत करती हिंदुद्वेषी कावकाव, दाभोलकरांच्या विवेकवादाला अंनिसकडून मूठमाती... विदेशी रक्कम हडपली... ट्रस्टचा ताळेबंद दिला नाही... लाखो रुपयांची उधळपट्टी आदी घोषणांचे फलक यावेळी महिला कार्यकर्त्या घेऊन उभ्या होत्या.
दाभोलकर हत्येचा खटला चालवण्यास अंनिसचा नकार का, अंनिसचा सनातनद्वेष खपवून घेणार नाही, हिंदुत्ववाद्यांवर पुरोगाम्यांच्या हत्यांचे खोटे आरोप आणि सनातन संस्थेच्या बंदीची मागणी हे अंनिसचे ढोंग आदी आशयांचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी यावेळी निदर्शने करून येजा करणाºया स्वाक्षरी घेतल्या. कर्नल पुरोहित यांच्या घरी आरडीएक्सचा साठा सापडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याबाबतही या पत्रकात उल्लेख आहे.