ज्येष्ठांना टीएमटीत भाडे सवलतीचा प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 06:30 AM2017-11-13T06:30:05+5:302017-11-13T06:30:27+5:30
ठाणे परिवहन सेवेमार्फत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मागील काही वर्षांत चांगली पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना टीएमटीच्या प्रवास भाड्यात सवलत देण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या परिवहनच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावानुसार ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या ऑनलाइनवर अर्ज उपलब्ध होणार असून तो भरून परिवहनच्या कार्यालयात जमा करायचा आहे. त्यानुसार, त्यांना आधारकार्ड दाखवून ओळखपत्र मिळणार असून प्रवास भाड्यात ५0 टक्के सवलत मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे परिवहन सेवेमार्फत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मागील काही वर्षांत चांगली पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना टीएमटीच्या प्रवास भाड्यात सवलत देण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या परिवहनच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावानुसार ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या ऑनलाइनवर अर्ज उपलब्ध होणार असून तो भरून परिवहनच्या कार्यालयात जमा करायचा आहे. त्यानुसार, त्यांना आधारकार्ड दाखवून ओळखपत्र मिळणार असून प्रवास भाड्यात ५0 टक्के सवलत मिळणार आहे.
शहरात ५२७५ इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या ग्राह्य धरून परिवहन उपक्रमाला वर्षाकाठी पाच कोटी १0 लाख ३२ हजार ११0 रु पये इतका तोटा अपेक्षित आहे. राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट उपक्र म आणि नवी मुंबई महापालिका परिवहनमध्ये ६५ वर्षांवरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना बस भाड्यात ५0 टक्के सवलत देण्यात येते. त्याच धर्तीवर ठाणे परिवहन उपक्र मामध्ये ही सवलत दिली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करताना ज्येष्ठांकडे आधारकार्डदेखील असावे, अशी मागणी सदस्य प्रकाश पायरे यांनी केली. शिवाय, एचआयव्हीबाधित रुग्णांनादेखील बस भाड्यात १00 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सवलतीसाठी संबंधित रु ग्णांना तपासणी केंद्राने दिलेली पुस्तिका दाखवावी लागणार आहे. महापालिका क्षेत्नात ४८५0 एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या असून त्यांना दिल्या जाणार्या सवलतीमुळे परिवहनवर वर्षाकाठी ३0 लाख ८४ हजार ६00 रुपये इतका बोजा पडणार आहे.