कठुआ बलात्काराच्या निषेधार्थ ‘संघर्ष’च्या वतीने कँडलमार्च
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 11:06 PM2018-04-14T23:06:06+5:302018-04-14T23:06:06+5:30
कठुआ सामूहिक बलात्कार व उन्नाव बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी ठाण्यात संघर्ष संस्थेचा कँडल मार्च
ठाणे - जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची करण्यात आलेली निर्घृण हत्या आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे 18 वर्षीय तरुणीवर भाजपा आमदाराने साथीदारांच्या मदतीने केलेला बलात्कार या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी ‘संघर्ष‘ या सेवाभावी संस्थेच्या वतीने कँडल मार्च करण्यात आला. शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा मार्च काढून निषेध नोंदवण्यात आला.
गडकरी रंगायतन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (कोर्टनाका)पर्यंत हा मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये महात्मा गांधींचे पणतु तुषार गांधी, खासदार कुमार केतकर, निवृत्त पोलीस अधिकारी शिरीष इनामदार, इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनकर देसाई, सचिव डॉ. संतोष कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.