निधी खर्च न करता ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांच्या आरोग्य केंद्रांची साफसफाई-स्वच्छता

By सुरेश लोखंडे | Published: November 22, 2022 03:42 PM2022-11-22T15:42:36+5:302022-11-22T15:42:44+5:30

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सध्या गोवरच्या साथीचा ताप वाढला आहे.

Sanitation of village health centers in Thane district without spending funds | निधी खर्च न करता ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांच्या आरोग्य केंद्रांची साफसफाई-स्वच्छता

निधी खर्च न करता ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांच्या आरोग्य केंद्रांची साफसफाई-स्वच्छता

Next

ठाणे : जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील आरोग्य विभागाकडून ग्रामीण व आदिवासी भागातील रहिवाश्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य केंद्र आहेत. त्यांची स्वच्छता व साफसफाई वेळेत व दैनंदिन व्हावे, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुजकुमार जिंदाल, यांनी या आरोग्य केंद्रांची स्वच्छता सप्ताह हाती घेतला आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी व्हाॅट्स अॅपच्या मान्यमातून मॉनिटरींग केले जात आहे.त्यामुळे काेणताही निधी खर्च न करता जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व १८७ उपकेंद्र चकचकीत होत आहेत.

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सध्या गोवरच्या साथीचा ताप वाढला आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील रहिवाश्यांच्या आरोग्याची काळजी घेणाºया प्राथमिक आरोग्य केंद्रांची अंतर्गत व बाह्य भागाची साफसफाई व स्वच्छतेकडे जिंदाल यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. आरोग्य केंद्रांची सकाळ, दुपार आणि सायंकाळ या कालावधीत स्वच्छता व साफसफाई करण्याचे जबाबदार तेथील कर्मचाºयांवर दिली आहे. हा स्वच्छता सप्ताह जिल्हाभर राबवण्यात येत आहे. त्यावर त्यांचे खास लक्ष असून या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी होत की नाही याची खात्री करून घेण्यासाठी जिंदाल यांनी व्हॉटअॅपच्या माध्यमातून मॉनिटरींग सुरू केली आहे.

आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध असलेल्या कर्मचाºयांकडून ही स्वच्छता व साफसफाई करून घेण्याची जबाबदार वैद्यकीय अधिकाºयांवर सोपवण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांना परिसरातील व्यक्तीकडून श्रमदान करून घेण्याची मुभा वैद्यकीय अधिकाºयांना दिली आहे. हा उपक्रम सप्ताह म्हणून सुरू केलेला असला तरी तो महिनाभर राबवण्यात येणार आहे. या उपक्रमातील कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात आलेला आहे. आरोग्य केंद्राचा आधीचा फोटो आणि साफसफाई, स्वच्छता सुरू केल्यामुळे चकचकीत झालेल्या आरोग्य केंद्राचा अंतर्गत व बाह्यभागातील फोटो वैद्यकीय अधिकाºयांकडून सीईओ यांना फॉर्वड केले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोणताही निधी खर्च न करता उपलब्ध मनुष्यबळावर जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची सफाई होऊन ते चकचकीत होत आहेत.

Web Title: Sanitation of village health centers in Thane district without spending funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.