केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते महापालिकेला स्वच्छता सर्वेक्षणाचे पुरस्कार

By धीरज परब | Published: October 2, 2022 06:22 PM2022-10-02T18:22:37+5:302022-10-02T18:23:08+5:30

स्वच्छता सर्वेक्षण २०२२ मध्ये मीरा भाईंदर महापालिकेला मिळालेल्या पुरस्करांचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री व केंद्रीय सचिव यांच्या हस्ते महापालिका आयुक्त, अधिकारी वर्गाने स्वीकारले. 

Sanitation survey awarded to Municipal Corporation by Union Minister | केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते महापालिकेला स्वच्छता सर्वेक्षणाचे पुरस्कार

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते महापालिकेला स्वच्छता सर्वेक्षणाचे पुरस्कार

Next

मीरारोड -

स्वच्छता सर्वेक्षण २०२२ मध्ये मीरा भाईंदर महापालिकेला मिळालेल्या पुरस्करांचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री व केंद्रीय सचिव यांच्या हस्ते महापालिका आयुक्त, अधिकारी वर्गाने स्वीकारले. 

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ नुसार आयोजिय इंडियन स्वच्छता लीग मध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेने ३ लाख ते १० लाख लोकसंख्या शहरी गटामध्ये देशात ३ ऱ्या तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे मानांकन पटकावले आहे . कचरामुक्त शहर गटात ३ तारांकित मानांकन तर देशपातळीवर सिटिझन फीडबॅक मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.   देशपातळीवर झालेल्या या सर्वेक्षणात ४३०० पेक्षा जास्त शहरांनी भाग घेतला होता. महानगरपालिका स्तरावर या स्पर्धेत अनेक आव्हाने होती व ७५०० गुणांच्या या स्पर्धेत विविध बाबी तपासल्या गेल्या असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. 

शनिवार १ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियम मध्ये  केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री कौशल किशोर व केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते महापालिका आयुक्त दिलीप ढोले , अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे , उपायुक्त रवी पवार , सहायक आयुक्त सचिन बच्छाव ह्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारले 

Web Title: Sanitation survey awarded to Municipal Corporation by Union Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.