ठाण्यातील तृतीयपंथीना संजय गांधी निराधारचा आधार

By सुरेश लोखंडे | Published: May 19, 2023 06:05 PM2023-05-19T18:05:23+5:302023-05-19T18:06:11+5:30

३४ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजना प्रमाणप्रत्राचे वाटप आज केले आहे. 

Sanjay Gandhi's base for the transgenders in Thane | ठाण्यातील तृतीयपंथीना संजय गांधी निराधारचा आधार

ठाण्यातील तृतीयपंथीना संजय गांधी निराधारचा आधार

googlenewsNext

ठाणे : राज्य शासनाच्या ‘जत्रा शासकीय योजनाची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ या संकल्पनेद्वारे ठाणे तहसीलदार कायार्लयाने परिसरातील तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार याेजनेचे प्रमाणपत्र देऊन त्यांना पेन्शनचा लाभ मिळवण्याचा आधार निश्चित झाला आहे. ठाणे तालुक्यासह आतापर्यंत जिल्ह्यातील १४० तृतीयपंथीयापैकी ३४ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजना प्रमाणप्रत्राचे वाटप आज केले आहे. 

संजय गांधी निराधार योजनेनुसार ठाणे तालुक्यातील तृतीय पंथीयांना पेन्शन चा आधार मिळवून देण्यासाठी ठाणे तहसिलदार युवराज बांगर, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, दत्ता बेर्डे यांच्या हस्ते या संजय गांधी निराधार याेजनेचे प्रमाणपत्र वाटप केले आहे. समाजातील मुख्य प्रवाहातून दूर किंवा दुर्लक्षित असलेल्या या तृतिय पंथी घटकासह अन्यही वंचित समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे महसूल विभागाने आता हा पुढाकार घेतला आहे.

तृतीय पंथीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना ओळखपत्र व या योजनेच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,पाठीराखा प्रतिष्ठान चे केशव जोशी यांच्या पाठपुराव्याने ह्या तृतीय पथीयांना हे प्रमाणपत्र प्राप्त झाले. ओळख मिळाल्याने तृतीय पंथीयानी तहसिलदार युवराज बांगर,नायब तहसिलदार दिनेश पैठणकर,संजय गांधी निराधार योजना नायब तहसिलदार दत्ता बेर्डे ह्यांचे आभार मानून हक्काची घर मिळण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी विनंती त्यांनी केली.

Web Title: Sanjay Gandhi's base for the transgenders in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.