प्रताप सरनाईकांवर संजय केळकरांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:37 AM2017-08-05T02:37:57+5:302017-08-05T02:37:57+5:30

मेट्रोसाठी घोडबंदर भागात प्रस्तावित असलेले ओवळा येथील कारशेड रद्द होणार असल्याचे निश्चित झाले असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा विरोध डावलून ते गायमुखजवळील जागेत हलवण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत.

 Sanjay Kelkar's victory over Pratap Sarnaik | प्रताप सरनाईकांवर संजय केळकरांची मात

प्रताप सरनाईकांवर संजय केळकरांची मात

Next

ठाणे : मेट्रोसाठी घोडबंदर भागात प्रस्तावित असलेले ओवळा येथील कारशेड रद्द होणार असल्याचे निश्चित झाले असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा विरोध डावलून ते गायमुखजवळील जागेत हलवण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत.
ओवळा येथे कारशेड उभारल्यास पर्यावरणाची मोठी हानी होईल आणि ही जागा व्यवहार्य नसल्याच्या मुद्द्यावर एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी ओवळा कारशेडच्या स्थलांतरासाठी आग्रही भूमिका मांडली होती. त्यावर एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांनी कारशेड ओवळ्याला होणार नसल्याचे सांगितले.
वडाळा ते कासारवडवलीचा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत विस्तारून पुढे मीरा-भार्इंदरपर्यंत नेण्याचे नियोजन असल्याने कारशेडची जागा बदलली जाणार आहे. आमदार केळकर यांनी स्थानिकांची बाजू समजावून घेत ती स्थलांतरित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर कारशेड स्थलांतराचा निर्णय झाला.

Web Title:  Sanjay Kelkar's victory over Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.