"संजय राऊत फिल्मी डायलॉग मारतात, त्यांना आम्ही महत्व देत नाही, संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी" श्रीकांत शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 02:39 PM2022-06-27T14:39:01+5:302022-06-27T14:39:45+5:30

Shrikant Shinde: संजय राऊत यांना आम्ही महत्व देत नसून ते केवळ फिल्मी डायलॉग मारत आहेत. सुप्रीम कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास असून आमाचाच विजय होईल , तसेच संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी आहे असा विश्वास कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

"Sanjay Raut kills film dialogues, we don't give importance to them, the whole Thane district is with us," said Shrikant Shinde. | "संजय राऊत फिल्मी डायलॉग मारतात, त्यांना आम्ही महत्व देत नाही, संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी" श्रीकांत शिंदेंचा टोला

"संजय राऊत फिल्मी डायलॉग मारतात, त्यांना आम्ही महत्व देत नाही, संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी" श्रीकांत शिंदेंचा टोला

Next

ठाणे - संजय राऊत यांना आम्ही महत्व देत नसून ते केवळ फिल्मी डायलॉग मारत आहेत. सुप्रीम कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास असून आमाचाच विजय होईल , तसेच संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी आहे असा विश्वास कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह माजी महापौर नरेश म्हस्के आणि मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थकांनी टेभी नाका आणि शक्तिस्थळावर शक्ती प्रदर्शन केले.

सोमवारी सकाळी शिंदे समर्थकांनी पुन्हा एकदा ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले. सुरुवातीला  टेभी नाका परिसरात शिंदे समर्थकांनी मोठी गर्दी केली. यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सर्व शिंदे समर्थक आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर पोचले. या ठिकाणीही शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, आम्ही कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करत नसून केवळ आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. शिवसेना ही वेगळी नसून बाळासाहेबांच्या विचारांवर आणि हिंदुत्वावर चालणाऱ्या शिवसेनेत आहोत असे त्यांनी सांगितले.

यामध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. ४० आमदारांचा आत्मा मेला असून त्यांचे मृतदेह केवळ येतील या राऊत यांच्या टीकेवर राऊत यांनी बोलताना विचार करायला हवा अशी टीका त्यांनी केली. संजय राऊत यांच्या बोलण्याला आम्ही महत्व देत नसून सुप्रीम कोर्टात विजय आमचाच होणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: "Sanjay Raut kills film dialogues, we don't give importance to them, the whole Thane district is with us," said Shrikant Shinde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.