संजय राऊत जामिनावर सुटलेले, ते अजून निर्दाेष नाहीत; शंभूराज देसाईंनी करून दिली आठवण
By सुरेश लोखंडे | Published: December 9, 2023 06:48 PM2023-12-09T18:48:58+5:302023-12-09T18:49:18+5:30
भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील पंतप्रधानाच्या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमानंतर देसाई ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात आले होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राेज सकाळी १० वाजता काेणाला तरी शिव्याश्याप दिल्या शिवाय संजय राऊत यांचा दिवस जात नाही. ते चांगले बाेलू शकत नाही. त्यामुळे राऊतांनी आता एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे की 'ते कुठल्या पुण्यकर्मासाठी ११० दिवस जेलमध्ये हाेते? याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. त्यानंतरच त्यांनी आमच्या सरकारवर टीका करावी, त्यांना म्हणावे तुम्ही जामिनावर सुटलेले आहेत. त्या प्रकरणातून तुम्ही निर्दाेष सुटलेले नाही. त्या प्रकरणाची चाैकशी अजून सुरू, अशी आठवण उत्पादन शुल्क राज्यमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना करून दिली आहे. ते ठाणे जिल्हा दाैऱ्यावर असताना पत्रकारांशी बाेलत हाेते.
भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील पंतप्रधानाच्या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमानंतर देसाई ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी बाेलते केले. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी राज्याचे सरकार दराेडाे टाकणाऱ्या घासिराम काेतवाल सारखे' असल्याची टीका केल्याचे देसाई यांच्या निदर्शनात आणून दिली, त्यावेळी देसाई यांनी ‘ ते ११० दिवस जेलमध्ये काेणत्या पुण्यकर्मासाठी हाेते’ अशी आठवण राऊत यांना करून दिली. याशिवाय ते निर्दाेष सुटलेले नसून त्याप्रकरणी अजून चाैकशी सुरू असल्याचेही त्यांनी राऊतांना आठवण करून देत स्पष्ट केले.
सध्या राऊन राज्य सरकारवर नाहक पुराव्याशिवाय आराेप करीत असतात. ते आता आंगवळणी पडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना आता गांभीर्याने घेत नसल्याचेही देसाई यांनी सांगितले. राऊतांना भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आमदार नितेश राणे उत्तर देत असतात. त्यामुळे काेणाचे ऑडीट करा, काेणाचे करू नका, काेणाच्या काय गाेष्टी तपासा, अशा गाेष्ठी बाेलणे ही राऊतांची सवय आहे, ते त्यांच्या अंगवळणी पडली आहे. त्यांच्या या सवयीकडे पत्रकारांनीही दुर्लक्ष केले तर बरे हाेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.