स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेत डोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर देशात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 05:39 PM2018-02-23T17:39:31+5:302018-02-23T17:39:31+5:30

Sanjeev Assistant post of Dombivli has a cheerful rojekar first in the country | स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेत डोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर देशात पहिला

स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेत डोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर देशात पहिला

Next
ठळक मुद्देविधी व न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदांच्या परिक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहेया परिक्षेसाठी प्रसन्नला १० मिनिटांत संवाद दिला होता. तो संवाद ४५ मिनिटांत १ हजार शब्द टाईप करायचे होते.प्रसन्नने ९५.०५ मार्क्स मिळविले आहेत.

 


स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेत
डोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर देशात पहिला
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली- विधी व न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदांच्या परिक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत असतानाच प्रसन्नने मिळविलेल्या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
प्रसन्नने २० जानेवारीला पुण्यात ही परिक्षा दिली होती. संपूर्ण भारतातून विद्यार्थी या परिक्षेसाठी आले होते. ही परिक्षा मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी होती. या परिक्षेला ३७ विद्यार्थी बसले होते. या परिक्षेत प्रसन्नने ९५.०५ मार्क्स मिळविले आहेत. या परिक्षेसंदर्भात १० जानेवारीला प्रसन्नला समजले. त्यांचा फारसा कुठे गाजावाजा केला नसल्याने परिक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या फारशी नव्हती. स्वीय सहाय्यक पदांच्या परिक्षेसाठी १०० शब्द प्रतिमिनिट लघुलेखन येणारा विद्यार्थी असणे आवश्यक होते. त्यासाठी प्रसन्न ६०, ८०, १०० आणि १२० शब्द प्रतिमिनिटांच्या परिक्षा दिल्या होत्या. या परिक्षा पास होण्यासाठी साधारणपणे २ वर्षाचा कालवधी लागत असल्याचे प्रसन्न सांगतो.
या परिक्षेसाठी प्रसन्नला १० मिनिटांत संवाद दिला होता. तो संवाद ४५ मिनिटांत १ हजार शब्द टाईप करायचे होते. या परिक्षेतून तीन जणांची निवड करण्यात आली आहे. पण प्रसन्न सर्वप्रथम आल्यामुळे नोकरीची पहिली संधी त्याला मिळणार आहे. प्रसन्न संधी नाकारल्यास पुढील उमदेवारांना संधी मिळणार आहे. प्रसन्नने ज्या ठिकाणी पोस्टींग मिळणार त्याठिकाणी जाणार असल्याचे सांगितले आहे.
प्रसन्न हा श्रमसाफल्य बिल्डींग, डीएनसी रोड याठिकाणी राहतो. त्यांचे शालेय शिक्षण जोंधळे हायस्कूल येथून झाले. तर स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातून तो वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. त्यांचे वडील तुळशीदास हे रिक्षाचालक आहेत. आई संगीता ही गृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. प्रसन्न नोकरी करीत असतानाच रात्रमहाविद्यालयातून शिक्षण ही पूर्ण करीत आहे. स्वीय सहाय्यकांची परिक्षा त्याला चांगली गेली होती. त्यामुळे चांगले मार्क्स मिळतील असे वाटले होते. पण भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळेल असा विचार कधी केला नव्हता. प्रसन्न येत्या ११ मार्चला एमपीएससीची परिक्षा देणार आहे. शॉर्टहॅण्ड या विभागासाठी तो परिक्षा देणार आहे. प्रसन्न लघुलेखनातच पुढे ही करियर करण्याची इच्छा आहे.
मराठी तरुणाने देशात पहिला येणाचा मान मिळवून डोंबिवलीची मान उंचाविल्याबद्दल मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सागर जेधे व त्यांच्या पदाधिकाºयांनी प्रसन्नाच्या घरी जाऊन त्याला पुष्पगुच्छ दिला. त्याचे विशेष अभिनंदन केले.
फोटो आहे- आनंद मोरे
----------------------------------------------------------

 

Web Title: Sanjeev Assistant post of Dombivli has a cheerful rojekar first in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.