एफएसआयच्या बदल्यात खासगी हॉस्पिटलकडून आरोग्य केंद्राची उभारणी- संजीव जयस्वाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 03:01 AM2018-09-12T03:01:18+5:302018-09-12T03:01:28+5:30
आरोग्य केंद्राच्या ठिकाणी असलेला अनुज्ञेय एफएसआय देऊन खाजगी हॉस्पिटलकडून आरोग्य केंद्राची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी घेतला.
ठाणे : आरोग्य केंद्राच्या ठिकाणी असलेला अनुज्ञेय एफएसआय देऊन खाजगी हॉस्पिटलकडून आरोग्य केंद्राची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी घेतला. यापुढे जाऊन ज्या शाळांची पटसंख्या कमी झाली आहे, त्या शाळा खाजगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णयसुद्धा त्यांनी घेतला आहे.
ठाणे महापालिकेच्या शाळा पहिल्या व दुसऱ्या सत्रात भरतात. ज्या शाळांमध्ये पहिल्या अथवा दुसºया सत्रात विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे अथवा ज्या शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत, अशा शाळा पीपीपी तत्त्वावर खाजगी संस्थांना १० वर्षांसाठी चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत. मात्र, त्या बदल्यात त्यात्या शाळांची संपूर्ण निगा व देखभाल, शाळेतील शिक्षकांचा पगार व हजेरी खर्च हा संबंधित संस्थांकडून करणे बंधनकारक राहणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तत्काळ तयार करावा, अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी अधिकाºयांना दिल्या. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अनुज्ञेय एफएसआय देऊन खाजगी हॉस्पिटलकडून आरोग्य केंद्राच्या इमारतीची उभारणी करण्यात येणार असून या आरोग्य केंद्राची निगा व देखभाल या खासगी संस्थांकडून करण्याच्या अटीवर देण्यात येणार आहेत.
>लेखाआक्षेप तातडीने निकाली काढण्याचे आदेश
ठाणे महापालिकेच्या विविध विभागांचे प्रलंबित लेखाआक्षेप आॅक्टोबर महिनाअखेर तत्काळ निकाली काढण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांना दिले आहेत. दरम्यान, काही विभागांचे लेखाआक्षेप प्रलंबित आहेत.
रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून प्रलंबित लेखाआक्षेप निकाली काढण्याबाबत आयुक्तांनी सूचित केले. तसेच साफसफाईचे काम दिवसाबरोबर रात्रीच्या वेळीही सुरू करण्याबाबत संबंधित विभागाला सूचित केले.