केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांची संक्रांत झाली गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:44 AM2021-01-16T04:44:18+5:302021-01-16T04:44:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापलिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने गुरुवारी कर्मचाऱ्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापलिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने गुरुवारी कर्मचाऱ्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले.
मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ जानेवारी २०२१ च्या फरकासह फेब्रुवारीत दिला जाणार आहे. तर, १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील फरकाची रक्कम पुढील पाच वर्षांत पाच समान हप्त्यांत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर, निवृत्त कर्मचाऱ्यांना तीन वर्षांत तीन समान हप्त्यांत रोखीने अदा करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभेत ४ डिसेंबर २०२० ला हा ठराव मंजूर करण्यात आला. तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. राज्य सरकारने २९ डिसेंबर २०२० ला त्याला मंजुरी दिली. जानेवारी २०२१ च्या वेतनात तो लागू करण्याचे मनपाला राज्य सरकारने कळविले होते. मनपाच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, अधिकारी, शिक्षण व परिवहन विभागाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी वर्गास हा आयोग लागू झाला आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीच ही बातमी आयुक्तांनी दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी आयुक्तांचे अभिनंदन केले.
फोटो : १५ : कल्याण-केडीएमसी
---------------------