मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांड: बहिणींनी मागितले तिच्या शरीराचे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 10:11 AM2023-06-10T10:11:29+5:302023-06-10T10:12:21+5:30

पोलिसांनी बहिणींच्या डीएनए तपासणीसाठी वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली आहे.

saraswati vaidya murder case in mira road sister demand her body parts | मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांड: बहिणींनी मागितले तिच्या शरीराचे तुकडे

मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांड: बहिणींनी मागितले तिच्या शरीराचे तुकडे

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड :मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांडाचा आरोपी मनोज साने हा पोलिसांची दिशाभूल करून वेगवेगळी माहिती देत आहे. सरस्वती ही अनाथ नसून तिच्या तीन बहिणी असल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. त्यांनी शुक्रवारी मीरा रोडमध्ये येऊन दाेघांचे मंदिरात लग्न झाल्याचा दावा पोलिसांकडे केला आहे, तसेच सरस्वतीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे मिळावेत, अशी मागणीही त्यांनी केली. 

पोलिसांनी बहिणींच्या डीएनए तपासणीसाठी वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली आहे. सरस्वतीच्या तुकड्यांचीही डीएनएची तपासणी केली जाणार आहे. साने याने पोलिसांना आधी सरस्वती व मी अनाथ असल्याचे सांगितले होते. मात्र, साने हा मूळचा बोरिवलीच्या बाभई भागातला असून, साने रेसिडेन्सीत त्याचा स्वतःचा फ्लॅट आणि चुलत्यांचे फ्लॅट आहेत, तर सरस्वती ही मूळची छत्रपती संभाजीनगरची होती. तिला चार बहिणी असून सरस्वती ही सर्वांत लहान होती. तिचे आई-वडील विभक्त झाल्याने पाचही बहिणींना अहमदनगरच्या बालिका अनाथाश्रमात ठेवले हाेते. 

कालांतराने बहिणींची लग्ने झाली. सरस्वती ही काही वर्षे बहिणींकडे राहायला होती. तीन बहिणी या एमएमआर क्षेत्रात राहत असून त्या शुक्रवारी मीरा रोडमध्ये आल्या होत्या. पोलिसांनी त्यांच्याकडून साने व सरस्वतीबाबत माहिती विचारली. मनोजशी मंदिरात लग्न केले असल्याचे सरस्वतीने बहिणींना सांगितले होते, तर साने याने पोलिसांना ते लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांगितले हाेते. दरम्यान, आपल्याला दुर्धर व्याधी असून चुलत्यांना काही सांगू नका, असे साने पोलिसांना सांगत आहे.


 

Web Title: saraswati vaidya murder case in mira road sister demand her body parts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.