सर्पमित्राने दिले विषारी सापाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:07+5:302021-07-26T04:36:07+5:30
ठाणे : ठाणे घोडबंदर पातलीपाडा एमएसईबी येथे वीज खंडित असल्यामुळे ट्रान्सफाॅर्मरचे काम करत असताना आत जाळीमध्ये हिरवा चापडा विषारी ...
ठाणे : ठाणे घोडबंदर पातलीपाडा एमएसईबी येथे वीज खंडित असल्यामुळे ट्रान्सफाॅर्मरचे काम करत असताना आत जाळीमध्ये हिरवा चापडा विषारी साप आढळला. या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. साप दिसल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सर्पमित्र अभिलाष डावरे व सचिन सूर्यवंशी यांनी सापाची सुटका केली. डावरे यांनी आतापर्यंत अनेक सापांना जीवदान दिले आहे. त्यांच्यामुळे वन विभाग, निसर्ग, फायरब्रिगेड व पोलिसांना मोठी मदत होत आहे.
---------------
चौकट
चापडा किंवा हिरवा चापडा हा विषारी साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून तो झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर राहतो. हा साप अंडी न घालता पिल्लांना थेट जन्म देतो, असे सर्पमित्र डावरे यांनी सांगितले.
-------------------
फोटो मेलवर