ठाणे पूर्वच्या सॅटीसने धरला वेग; ५४ % काम पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 12:28 PM2022-08-07T12:28:05+5:302022-08-07T12:28:27+5:30
या ठिकाणी ६ मीटर उंचीचा डेक असणार असून त्यावर १४ बसथांबे असणार आहेत.
विशाल हळदे
ठाणे : ठाणे पूर्वच्या सॅटीसच्या कामाने आता वेग पकडला आहे. या प्रकल्पाचे काम ५४ टक्याहून अधिक झाल्याचे दिसत आहे. या पुलाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरत असलेल्या रेल्वेच्या हद्दीतील कामही सुरु झाले आहे. तसेच गर्डर टाकण्याचे कामही युध्द पातळीवर सुरु झाले आहे. मंगला हायस्कुल जवळील भाग थोडा कमी असल्याने त्या ठिकाणी स्टील स्वरुपातील गर्डर रेडीमेड स्वरुपात उपलब्ध करुन ते टाकले जाणार आहेत. तर हे काम डिसेंबर २०२३ र्पयत हे काम पूर्ण करण्याचा मनोदय पालिकेचा आहे.
या ठिकाणी ६ मीटर उंचीचा डेक असणार असून त्यावर १४ बसथांबे असणार आहेत. शिवाय बसेससाठी ७ हजार स्केअर मीटरचा टर्मिनलही उभारला जाणार आहेत. पूव्रेकडील बाजूस ११ हजार १०० चौसर मीटर जागा असून त्यापैकी १० हजार चौ. मी. जागा रेल्वेची असून ११०० चा.ैमी. जागेवर रस्ता आहे. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी पुलापासून जो तीन किमी लांबीचा रस्ता स्टेशनपर्यंत येतो तेवढा फ्लाय ओव्हर केला जाणार आहे.. तसेच या योजनेमध्ये नवीन कोपरी पुलाच्या बाजूस नव्याने आर.ओ.बी. बांधून ठाणे रेल्वेस्थानकार्पयत किमान ५.५० मी. उंचीवर तीन मार्गिकांचा एलिव्हीटेड रोड बांधून तो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. यांच्यामार्फत प्रस्तावित वाणिज्यिक विकासाखालील डेकला जोडण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे लोकमान्य टिळक मार्ग - कृष्णा बोरकर मार्गावर दोन मार्गिकांचा एलिव्हेटेड रोड बांधून पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडून आनंदनगर बाजूस उतविण्यात येण्याचे व त्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ दुसरा आर.ओ.बी. बांधला जाणार आहे. तसेच ठाणे पूर्व येथे कोपरी पुलाच्या बाजूला पार्कींगकरीता आरक्षण व फुड कोर्पोरेशन इंडियाचे जागेवर बस टर्मिनल बांधण्यात येणार आहे.
इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी पुलापासून जो तीन किमी लांबीचा रस्ता स्टेशनपर्यंत येतो तेवढा फ्लाय ओव्हर केला जाणार आहे. त्याशिवाय स्टेशनमोरील जागेवर पश्चिमेच्या धर्तीवर ६ मीटर उंचीचा एक डेक उभारला जाणार असून वरील बाजूस टीएमटी, एसटी आणि बेस्टच्या बसेसचे १४ थांबे असणार आहेत. तर, तळमजल्यावर रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रकल्पासाठी २६५ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यानुसार आता याचे ५४ टक्के कामही पूर्ण झाले असून अत्याधुनिक पध्दतीने दिवसाच्या सत्रतच येथील गर्डर लॉचींगचे कामही केले जात आहे. दुसरीकडे मंगला हायस्कुल जवळ काही भाग कमी स्वरुपात असल्याने त्याठिकाणी स्टीलचे रेडीमेड गर्डर टाकले जाणार आहेत. त्या गर्डरची पाहणी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दमण येथे जाऊन केली आहे. त्यानुसार येथील गर्डर लॉन्च झाल्यानंतर याचा आणखी एक महत्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानुसार लवकरात लवकर या सॅटीसचे काम पूर्ण करुन तो ठाणोकरांच्या सेवेत देण्याचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.