ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांत समाधानकारक घट, मंगळवारी ७६७ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:53+5:302021-05-19T04:41:53+5:30
ठाणे : जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या खाली असून मंगळवारी ७६७ रुग्ण सापडले असून ५० ...
ठाणे : जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या खाली असून मंगळवारी ७६७ रुग्ण सापडले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख तीन हजार २५३ रुग्णांची व आठ हजार ५८३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील या रुग्णसंख्येत ठाणे शहरात आढळलेल्या १७२ रुग्णांसह आठ मृतांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक लाख २६ हजार ८५९ झाली असून मृतांची संख्या एक हजार ८२० नोंदली गेली. याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीत २२५ बाधित व १८ मृत्यू झाल्याचे आढळले आहे. यासह या शहरात एक लाख ३० हजार ५४२ बाधितांसह एक हजार ७२३ मृतांची नोंद झाली आहे.
उल्हासनगरमध्ये १९ बाधित व एक मृत्यू झाला आहे. यासह शहरात १९ हजार ८३७ बाधितांना ४६१ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीत १० बाधित व दोन मृत्यू झाल्याचे आढळले. यासह या शहरातील दहा हजार २४० बाधितांसह ४२२ मृत्यू नोंद झाले आहेत. मीरा-भाईंदरला ११० बाधित व आठ मृत्यू झाले आहेत. या शहरातील ४७ हजार ४३० बाधितांसह एक हजार २०७ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंबरनाथमध्ये २१ बाधित व एकही मृत्यू झाला नाही. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १८ हजार ८५३ व मृतांची संख्या ३९६ कायम आहे. कुळगांव बदलापूर शहरात ३३ बाधित सापडले. यासह येथील बाधित २० हजार १३२ तर मृत्यू ३३२ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५ बाधित आणि पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे या ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत ३२ हजार ७२२ बाधितांची व ८०२ मृतांची नोंद झाली आहे.