सतीश चाफेकर यांचा पुन्हा लिम्का बुक रेकॉर्डचा चौकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 02:40 AM2018-12-28T02:40:32+5:302018-12-28T02:40:47+5:30
सह्याजीराव म्हणून ओळखले जाणारे सतीश चाफेकर यांच्या रेकॉर्डची पुन्हा एकदा लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. सलग चौथ्यांदा त्यांचे रेकॉर्ड लिम्का बुकमध्ये नोंदवले आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : सह्याजीराव म्हणून ओळखले जाणारे सतीश चाफेकर यांच्या रेकॉर्डची पुन्हा एकदा लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. सलग चौथ्यांदा त्यांचे रेकॉर्ड लिम्का बुकमध्ये नोंदवले आहे. यावेळी प्रणव धनावडे याच्या ३३ बॅटवर ३२३ स्वाक्षऱ्या घेतल्याबद्दल त्यांचे रेकॉर्ड नोंदवले आहे. प्रणवने ३२३ चेंडूंत नाबाद १००९ धावा केल्या होत्या, त्याबद्दल त्यांनी या स्वाक्षºया घेतल्या होत्या.
चाफेकर यांच्या नावावर लागोपाठ तीन वर्षे तीन लिम्का रेकॉर्ड असून नुकतेच चौथे रेकॉर्डही केले आहे. त्यांनी डोंबिवलीला अनोखे स्वाक्षरी संग्रहालय बनवले असून तिथे अनेक मान्यवर आपली स्वाक्षरी करून गेले आहेत. त्यामध्ये डॉ. माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. वसंत गोवारीकर, बाबासाहेब पुरंदरे, निदा फाजली, कवी ग्रेस, महेश काळे, शौनक अभिषेकी, डॉ. प्रकाश आमटे, अतुल परचुरे, रत्नाकर मतकरी, मधू मंगेश कर्णिक, प्रवीण दवणे, मंदाकिनी आमटे, वासुदेव कामत असे १६० जण स्वाक्षरी करून गेले. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी त्यांचे खूप मोठे चित्र चाफेकर यांच्या स्वाक्षरीच्या भिंतीवर केले आहे. हे घर भारतातील पहिलेच घर असल्याने त्याचे ‘लिम्का रेकॉर्ड’ झाले. त्यांचे दुसरे लिम्का रेकॉर्ड म्हणजे, राहुल द्रविड याच्या कारकिर्दीत त्याने ४८ शतके केली, म्हणून त्याच्या ४८ स्वाक्षºया आहेत. तिसरे रेकॉर्ड सचिन तेंडुलकर याच्या स्वाक्षºयांचे आहे. त्याची पहिली स्वाक्षरी १९९० मध्ये घेतली होती. त्याच्या एकूण १०० स्वाक्षºया चाफेकर यांच्या संग्रही असून त्या त्याने १०० शतके केल्याबद्दल आहे, तर चौथे लिम्का रेकॉर्ड प्रणव याच्याबद्दल झाले आहे. आपल्या स्वाक्षरीसंग्रहाची ते विविध ठिकाणी प्रदर्शनेही भरवतात. रेकॉर्ड हे रेकॉर्डच असते. प्रणवच्या रेकॉर्डचे मी रेकॉर्ड केले, असे चाफेकर यांनी लोकमतला सांगितले. वयाच्या अकराव्या वर्षी मान्यवर लेखक, कलाकार, वैज्ञानिक अशा सुप्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षºया घेण्याचा छंद त्यांना जडला. तो आजतागायत म्हणजे जवळजवळ ५० वर्षे चालू आहे. त्यांच्याकडे जवळपास १० हजार मान्यवरांच्या स्वाक्षºया आहेत. सध्या त्यांचे लोकमतमध्ये ‘क्रिकेटरेषा’ हे सदर सुरू आहे.