ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष सतीश प्रधान यांचे निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 29, 2024 15:11 IST2024-12-29T15:11:26+5:302024-12-29T15:11:41+5:30

सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले

Satish Pradhan passes away | ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष सतीश प्रधान यांचे निधन

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष सतीश प्रधान यांचे निधन

ठाणे: ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे आज दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. 

सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.

काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. गोडबोले हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यातील दाखल केले होते. ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी १९८० साली स्थापन केले. माजी खासदार, ठाण्याचे पाहिले नगराध्यक्ष, पाहिले महापौर राहिले आहेत. ठाणे शहरात पहिली महापौर मॅरेथॉन सुरू केली. त्यांच्याकडे स्मार्ट सिटीची दूरदृष्टी होती. 

ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सध्या मानद अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 

Web Title: Satish Pradhan passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे