सतीश मांगलेला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:24 AM2017-11-13T01:24:57+5:302017-11-13T01:26:42+5:30

खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेसह तिन्ही आरोपींची रवानगी  रविवारी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सनदी अधिकारी राधेश्याम  मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक  करण्यात आली होती.

Satish seeking judicial custody | सतीश मांगलेला न्यायालयीन कोठडी

सतीश मांगलेला न्यायालयीन कोठडी

Next
ठळक मुद्देपुन्हा पोलीस कोठडी मागणार मोपलवार यांच्याकडून खंडणी मागण्याचे  प्रकरण 

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेसह तिन्ही आरोपींची रवानगी  रविवारी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सनदी अधिकारी राधेश्याम  मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक  करण्यात आली होती.
रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मो पलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी, १  कोटी रुपयांची खंडणी घेताना खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची  दुसरी पत्नी अभिनेत्री श्रद्धा यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने २  नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोन वेळा  पोलीस कोठडी सुनावली. रविवारी दुसर्‍या पोलीस कोठडीची मुदत संपली.  खंडणीविरोधी पथकाने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता,  त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
दरम्यानच्या काळात सतीश मांगले याच्याविरोधात नवी मुंबई येथील आणखी  एक तक्रार आली होती. खांदेश्‍वर येथील समीर जाधव याचे एका  तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या तरुणीला कुटुंबीयांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर,  तिचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी समीरने सतीश मांगलेची मदत घे तली होती. रबाळे येथे एका खासगी कंपनीत मोठय़ा पदावर काम करणार्‍या  समीरने त्यासाठी मांगलेला ४ लाख रुपये दिले होते. मांगलेने समीरचे काम  केले नाही, उलट बदनामीच्या धमक्या देऊन समीरकडून खंडणी  उकळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्रस्त झालेल्या समीरने विषारी द्रव्य प्राशन  करून आत्महत्या केली होती. हे प्रकरण पाच वर्षांपूर्वीचे असून, मांगलेच्या  अटकेची बातमी समजल्यानंतर समीरचे वडील खंडणीविरोधी पथकाकडे  आले. मात्र, घटनास्थळ नवी मुंबईच्या हद्दीत असल्याने, खंडणीविरोधी प थक त्यांना मदत करू शकले नाही. 
खंडणीच्या प्रकरणाचा तपास संपलेला नाही. मांगलेच्या लॅपटॉपमध्ये ४000  कॉल रेकॉर्ड्स पोलिसांना मिळालेत. या रेकॉर्ड्सची तपासणी सुरू असून,  आणखी काही महत्त्वाचे पुरावेही पोलिसांना मिळालेत. त्या आधारे आरो पींच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी केली जाईल, असे खंडणीविरोधी प थकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले.

एकाची चौकशी बाकी
या प्रकरणात सतीश मांगले याचा सहकारी अनिल वेदमेहता याची चौकशी  पोलिसांनी अद्याप केली नाही. वेदमेहता जुहू येथे राहणारा असून, खंडणी  प्रकरणात त्याचाही सहभाग समोर आला आहे. तक्रारीत आणखी एकाचे  नाव असून, तो साक्षीदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

Web Title: Satish seeking judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.