शौचालयाशेजारी सावरकरांचे शिल्प; मनसेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:34 AM2020-10-07T00:34:51+5:302020-10-07T00:35:02+5:30

नाहक राजकारण सुरू असल्याची नगरसेवकाची टीका

Savarkar's sculpture next to the toilet; MNS allegation | शौचालयाशेजारी सावरकरांचे शिल्प; मनसेचा आरोप

शौचालयाशेजारी सावरकरांचे शिल्प; मनसेचा आरोप

Next

ठाणे : सावरकरनगर येथे नगरसेवक निधीतून बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाशेजारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीशिल्प साकारणे म्हणजे एकप्रकारे महापुरुषाची विटंबनाच नव्हे का, अशी टीका मनसेने केली आहे. सावरकरांचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नसून हे भित्तीशिल्प मूळ जागेवरून हलविण्यात येणार आहे. मनसे स्वा. सावरकरांच्या नावावर राजकरण करीत असल्याचा प्रत्यारोप स्थानिक नगरसेवकाने केला आहे.

श्री आई माताजी चौक, सावरकरनगर येथे काही वर्षांपूर्वी नगरसेवक निधीतून शौचालयाचे व मुतारीचे बांधकाम झाले आहे. त्याच्या शेजारीच असणाऱ्या मोकळ्या जागेचे प्रभाग सुधारणा निधीतून सुशोभीकरण सुरू आहे. परंतु, सुशोभीकरणाच्या नावाखाली त्या ठिकाणी स्वा. सावरकर यांचे भित्तीशिल्प लावण्यात आले आहे. सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला अशा प्रकारे महापुरुषांचे शिल्प साकारणे म्हणजे एकप्रकारे विटंबनाच नव्हे का, असा प्रश्न मनसे शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी महापालिकेला निवेदन दिले आहे. स्वा. सावरकर हे हिंदुस्थानची अस्मिता असून त्यांची अशा प्रकारची विटंबना एक सावरकरप्रेमी म्हणून आम्ही सहन करणार नाही, असे कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सावरकरनगर येथील या सार्वजनिक शौचालयाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भित्तीशिल्प आम्ही मूळ जागेतून हलवून दुसºया जागी लावणार आहोत. मनसेला ही जागा हडपायची होती, म्हणून ते हा आरोप करीत आहेत. - दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेवक

Web Title: Savarkar's sculpture next to the toilet; MNS allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.