‘हॅशटॅग महाराष्ट्र वाचवा’ लॉकडाऊ नविरोधात चळवळ; सोशल मीडियावर आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:48 AM2020-07-19T00:48:39+5:302020-07-19T00:48:50+5:30

ठाणेकरांची हाक

‘Save Maharashtra with Hashtag’ Lockdown Movement | ‘हॅशटॅग महाराष्ट्र वाचवा’ लॉकडाऊ नविरोधात चळवळ; सोशल मीडियावर आवाहन

‘हॅशटॅग महाराष्ट्र वाचवा’ लॉकडाऊ नविरोधात चळवळ; सोशल मीडियावर आवाहन

googlenewsNext

- प्रज्ञा म्हात्रे 

ठाणे : लॉकडाऊनला विरोध करत ठाण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींनी ‘हॅशटॅग महाराष्ट्र वाचवा’ ही पोस्टर चळवळ सोशल मीडियावर शुक्रवारपासून सुरू केली आहे. लॉकडाऊन वाढवून कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. कोरोनावर लॉकडाऊन हे औषध नाही, त्यामुळे लॉकडाऊन हटवावे, अशी मागणी करणारे पोस्टर्स बनवून त्यात आपणच जबाबदारीने वागून थांबलेले आयुष्य पुढे नेऊ या, असा संदेश देण्यात आला आहे.पर्यावरण अभ्यासक व निवेदक मकरंद जोशी, व्यावसायिक सुजय पत्की, कमर्शिअल आर्टिस्ट अतुल जोशी यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी राहिली आहे. लोकांचा त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

२ जुलैला ठाण्यात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आणि ठाणेकरांचा विरोध तीव्र होऊ लागला. पुन्हा लॉकडाऊन वाढवू नये. लॉकडाऊन हा उपाय नाही, हे प्रशासनाला सांगत नागरिकांनी स्वत:हूनच जबाबदारीने वागावे, याबाबत जागृती करणारी ही चळवळ उभी राहिली आहे. लॉकडाऊनविरोधात ठाणेकर सोशल मीडियावर किंवा आपापसांत व्यक्त होत आहेत. लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा लोकांनी जबाबदारीने वागावे म्हणून ही लोकचळवळ सुरू केली असल्याचे मकरंद जोशी यांनी सांगितले.

शासन आणि प्रशासनाने लोकांना नियमांबाबत जाणीव करून दिली पाहिजे. मास्क नाही घातले, सोशल डिस्टन्सिंग नाही पाळले म्हणून संख्या वाढते, हे नागरिकांच्या माथी मारायचे, हे शासनाचे धोरणच चुकीचे आहे. त्यामुळे लोकांना आत्मविश्वास या चळवळीतून देत आहोत, असे त्यांनी सांगितले. अतुल जोशी यांनी हे पोस्टर तयार केले आहे.

यांचा आहे सहभाग

सामान्य नागरिक, सेवा पुरविणारा, रिक्षा-टॅक्सी-चालक, कामगार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, कलाकार, कर्मचारी यांना सहभागी करून या पोस्टरवर मी जबाबदारीने वागेन, असा मजकूर लिहिला आहे. यात मी माझ्या कार्यक्षेत्रात पुन्हा कार्यरत होऊन योग्य अंतर आणि नियमित स्वच्छतेने माझ्या संपर्कातल्या सगळ्यांची काळजी घेईन. ‘हॅशटॅग करू या जबाबदारीने पुन्हा सुरुवात’ असे नमूद करण्यात आले आहे.

Web Title: ‘Save Maharashtra with Hashtag’ Lockdown Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.