स्टेशन परिसरातील अत्याधुनिक जवाहर बाग स्मशानभुमीचे काम अंतिम टप्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 04:40 PM2019-01-29T16:40:07+5:302019-01-29T16:42:24+5:30
येत्या काही दिवसात स्टेशन परिसरातील अत्याधुनिक स्वरुपातील जवाहरबाग स्मशानभुमी सुरु होणार आहे. काही कामे शिल्लक असल्याने ती पूर्ण करण्याची लगबग सध्या युध्द पातळीवर सुरु आहे.
ठाणे - ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जवाहरबाग स्मशानभुमीच्या विस्तारीकरण आणि आधुनिकरणाचे काम आता शेवटच्या टप्यात आले आहे. ही स्मशानभुमी २६ जानेवारीला कार्यान्वित होणार होती. अंतिम टप्प्यात आले असून 26 जानेवारीला ही स्मशानभुमी कार्यिन्वत करण्याचा महापालिकेचा विचार होता. मात्र, काही महत्वाची कामे शिल्लक राहिल्याने हा मुहुर्त आता लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता यासाठी पुढील महिन्याचा मुर्हुत काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आणि शहरातील सर्वात जूनी स्मशानभुमी म्हणून जवाहरबाग स्मशानभुमीची ओळख आहे. स्माशनभूमीच्या दिशेने जाणारे रस्ते अरु ंद आहेत. सतत वर्दळीचा रस्ता असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होते. तसेच स्मशानभुमीची जागाही लहान असल्याने तिथे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. याशिवाय, स्मशानभूमीतील उष्णता, वास आणि धुराच्या प्रदुषणाचा परिसरातील वसाहतींना त्रास होत होता. परंतु हीच नेमकी बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशानाने दोन वर्षांपुर्वी या स्मशानभुमीच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सर्वसाधारण सभेने सीएसआर फंडातून काम करण्यास परवानगी दिली. त्यानुसार सहियारा संस्थेच्या माध्यमातून स्मशानभुमीचे काम सुरु करण्यात आले होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दहा दिवसांपुर्वी पाहाणी दौरा करून स्मशानभुमीशी निगडीत कामे युध्द पातळीवर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. स्मशानभुमीसमोरील रस्त्याचे बांधकाम करणे आणि त्यामध्ये बाधीत होणाºया कुटूंबांचे पुनर्वसन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तसेच २६ जानेवारीला स्मशानभुमी कार्यान्वित करण्याच्या सुचनाही त्यांनी अधिकाºयांना दिल्या होत्या. मात्र, अंतिम टप्प्यातील कामे पुर्ण झालेली नसल्याने ही तारीख टळली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात स्मशानभुमी कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
अग्निशमन इमारतीपासून वखारीपर्यंत वेगवेगळ्या सहा भागांमध्ये प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार जुन्या स्मशानभुमीच्या जागेच्या चार पट म्हणजेच ३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात नवीन स्मशानभुमी उभारण्यात आली आहे. त्यासाठी या भागातील बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. मृतदेहांवर अंत्य संस्कार करण्यासाठी सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील उष्णता, धूर शोषूण घेण्यासाठी चिमणी बसविण्यात आली आहे. त्यामुळे आसपासच्या भागाला यापुर्वी होणारा त्रास टळणार आहे.