सांगाव, सांगर्लीत पाणीटंचाईवरून वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:02+5:302021-03-05T04:41:02+5:30
डोंबिवली : भोपर, नांदिवलीपाठोपाठ आता सांगाव, सांगर्ली भागातही पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागातून कमी ...
डोंबिवली : भोपर, नांदिवलीपाठोपाठ आता सांगाव, सांगर्ली भागातही पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागातून कमी दाबाने पाणी सोडण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली. पाण्यावरून आपापसात बाचाबाचीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही समस्या तातडीने सुटावी, अशी मागणी रहिवाशांनी केली.
पाणीसमस्येमुळे बुधवारी व गुरुवारी तेथे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे प्रभागाच्या माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी रहिवाशांची संवाद साधून आपापसात वाद घालू नका, असे आवाहन केले. रहिवाशांनी पाटील यांच्यापुढे समस्येचा पाढा वाचल्यावर त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. पाणी कमी दाबाने येत आहे याबाबत महापालिका व एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांना पत्र दिल्याचे सांगण्यात आले.
उन्हाळा सुरू झाला असून, पाणीटंचाई भेडसावणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर नागरिक शांत झाले. पाणीसमस्या सुटावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
-----------------