जिल्ह्यावर टंचाईची कु-हाड, २२ टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 03:15 AM2018-10-23T03:15:55+5:302018-10-23T03:16:04+5:30

अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.

 The scarcity of water in the district, 22 percent watercourses | जिल्ह्यावर टंचाईची कु-हाड, २२ टक्के पाणीकपात

जिल्ह्यावर टंचाईची कु-हाड, २२ टक्के पाणीकपात

Next

ठाणे : ठाणे शहराचा काही भाग, घोडबंदरसह जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पूर्ण बंद ठेवण्याची सक्ती आता लागू झाली आहे.
बारवी धरणासह उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणीपुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणीकपातीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. एमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींद्वारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणीबचत करायची आहे. यामुळे महापालिकांनी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
>यंदा महिनाआधीच पाणीकपात
जिल्ह्यात सक्तीने लागू केलेली २२ टक्के पाणीकपात आगामी दिवाळी, ईद आदी सणासुदीच्या काळात मात्र रद्द करण्यात येणार आहे. यामुळे सणवाराच्या कालावधीत मात्र मनसोक्त नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धरणातील पाण्यातील तूट लक्षात घेऊनगेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना आधी ही सक्तीची पाणीकपात लागू करावी लागली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून ती १४ टक्के लागू केली होती. मात्र, नंतर फेब्रुवारी, मार्चला ती ७ टक्के केली होती. त्यानंतर ती रद्द केली होती. आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघूपाटबंधारे विभागाने सक्तीची २२ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकांसह एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदींना तो सक्तीने पाळावा लागणार आहे.
>अशी होईल दिवसनिहाय कपात
सोमवारपासून ही सक्तीची पाणी कपात लागू झाली आहे. यानुसार बारवी धरणासह उल्हास नदीतून पाणी उचलणाºया एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणीपुरवठा आता शुक्रवारी या एक दिवसाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यामुळे एमआयडीसीकडून सुमारे ५८३ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत होणार आहे. कल्याण - डोंबिवलीचा २३४ एलएलडी पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर स्टेमद्वारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणीपुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. यामुळे ठाणेच्या काही भागांसह भिवंडी मनपासह मीरा-भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील गावखे्यांचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहील. अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी पुरवठा बंद ठेवणार आहे. यामुळे ९० एमएलडी पाणीबचत एमजेपीकडून बचत होणार आहे. या पाणीकपातीमुळे बचत होणारे धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे.

Web Title:  The scarcity of water in the district, 22 percent watercourses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी