शिष्यवृत्ती अर्जांची अशी आहे विगतवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:10+5:302021-07-01T04:27:10+5:30
१) एससी प्रवर्गातील १३,८८४ अर्ज ऑनलाईन प्राप्त - २) समाजकल्याण विभागाने निकाली काढले - १३,४०० ३) तपासणीमुळे प्रलंबित - ...
१) एससी प्रवर्गातील १३,८८४ अर्ज ऑनलाईन प्राप्त -
२) समाजकल्याण विभागाने निकाली काढले - १३,४००
३) तपासणीमुळे प्रलंबित - ४८३
--------
१) व्हीजेएनटी प्रवर्गाचे २४,१५२ अर्ज ऑनलाईन प्राप्त
२) समाजकल्याण विभागाने निकाली काढले -१९,०००.
३) समाजकल्याणसह महाविद्यालयात प्रलंबित- ५,१५२
-------------
* विद्यार्थी प्रतिक्रिया -
१) कोरोना काळातही महागाई वाढलेली आहे. या महागाईला आमचा परिवार तोंड देत आहे. या दरम्यान शैक्षणिक खर्च शिष्यवृत्तीतून भागवता येईल. पण या शिष्यवृत्तीलाही विलंब झाला आहे. त्यामुळे मित्रांच्या सहकार्याने त्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन धडे घेत आहे. स्वत:चा मोबाईल घेणे शक्य झाले नाही.
- महादेव शेंडगे, उल्हासनगर
-----
२) काॅलेज बंद असल्याने गेल्या वर्षाची स्कॉलरशीप मिळालेली नाही. ही रक्कम जमा झाली की नाही, यासाठी अधूनमधून बँकेत विचारतो. काही मित्रांना या स्कॉलरशीपचा लाभ झाला आहे. मलाही ती मिळण्याची आशा आहे.
- पंडित ससाने, अंबरनाथ
-------
४) समाजकल्याण अधिकाऱ्याचा कोट-
- जिल्ह्यातील महाविद्यालयांनी व्हीसीव्दारे सतत संपर्क करून व त्यांना पत्राद्वारे आतापर्यंत एकूण ३८ हजारच्यावर शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त झाले. आमच्या पातळीवर त्यांची छाननी करून त्यात आढळणाऱ्या चुका व कागदपत्रांची कमी भरून काढण्यासाठी संबंधीत अर्ज महाविद्यालयांकडे पाठवतो. योग्य व परिपूर्ण अर्ज महाडीबीटीकडे पाठवण्यात येत आहेत. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळत आहे.
- बलभीम शिंदे
सामाजिक न्याय अधिकारी, ठाणे
-