शाळेची मालमत्ता परस्पर भाड्याने दिली, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 02:25 AM2022-03-24T02:25:07+5:302022-03-24T02:25:45+5:30
मीरारोड - भाईंदर येथील एका शैक्षणिक संस्थेच्या खोल्या परस्पर भाड्याने दिल्याप्रकरणी संस्थेच्या वतीने एकाविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
मीरारोड - भाईंदर येथील एका शैक्षणिक संस्थेच्या खोल्या परस्पर भाड्याने दिल्याप्रकरणी संस्थेच्या वतीने एकाविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
गोरेगाव येथे राहणारे फिर्यादी शर्मेन मोहन जॉर्ज यांची भाईंदर एज्युकेशन ट्रस्ट नावाची संस्था असून, सदर संस्थेतर्फे भाईंदर उड्डाणपूल जावन द बिशप स्कुल नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात आहे. शर्मेन हे २०१७ पासून या संस्थेचे अध्यक्ष आहेत. द बिशप स्कुल ही शाळा पुर्वी २००४ सालापर्यंत भाईंदरच्या बद्रीनाथ इमारतीतील ५ खोल्यामध्ये चालवली जात होती. त्या पाचही खोल्या संस्थेच्या मालकी हक्काच्या असून त्याचे मेंटेनन्स संस्था करते.
संस्थेच्या इमारतीतील खोल्यांची पाहणी करण्यात आली असता त्या खोल्यांच्या बाहेरून वेगळी टाळी मारण्यात आली होती. आजूबाजूला चौकशी केली असता सदर खोल्यांमध्ये महालक्ष्मी स्वीटमार्ट व कपडे वाल्याचे सामान ठेवल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले. चौकशीत ३ खोल्यांचा भाडे करार देवेंद्र जोशी यांच्याशी परस्पर मालक म्हणून क्लरेंन्स ग्रेगरी डीसील्वा रा. ग्रेगनीका व्हिला, मांडली स्ट्रीट, भाईंदर ह्याने केल्याचे आढळले. तसेच अन्य २ खोल्या सुद्धा क्लरेन्स ह्याने भाड्याने दिल्या असल्याचे समजले. भाड्याची रक्कम तो परस्पर घेत होता .
भाईंदर एज्युकेशन ट्रस्टच्या नावे असलेल्या ५ खोल्या क्लरेंन्स डीसील्वा ह्याने परस्पर भाड्याने देऊन संस्थेची फसवणूक केली अशी फिर्याद शर्मेन यांनी दिल्या नुसार, भाईंदर पोलिसांनी २१ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे .