उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंड विरोधात व्यापाऱ्यांसह शालेय विद्यार्थी रस्त्यावर, दुकानं बंद
By सदानंद नाईक | Published: June 23, 2023 05:04 PM2023-06-23T17:04:14+5:302023-06-23T17:04:59+5:30
धुराने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डम्पिंग हटविण्याची मागणी व्यापारी संघटना, स्थानिक नागरिकांनी केली.
उल्हासनगर : शहरातील खडी खदान डम्पिंग ग्राऊंडमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक, व्यापारी व शालेयमुळे रस्त्यावर उतरले. डम्पिंग हटविण्याची मागणी करून व्यापाऱ्यानी दुकाने बंद ठेवले असून पोलिसांनी काही जणांनी ताब्यात घेतले. उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरातील खडी खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरप्लॉच्या मार्गावर असून डम्पिंगला वारंवार आग लागून धुराचे साम्राज्य निर्माण झाले. या धुराने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डम्पिंग हटविण्याची मागणी व्यापारी संघटना, स्थानिक नागरिकांनी केली.
या विरोधात जनमत तयार करण्यासाठी व महापालिकेचे लक्ष आकर्षण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शुक्रवारी २३ जून रोजी आंदोलन करून दुकाने बंद ठेवण्यात आले. डम्पिंग हटावच्या मागणीसाठी स्वामी शांतीप्रकाश शाळेतील शेकडो विध्यार्थी, शिक्षक रस्त्यावर उतरले. यावेळी व्यापारी, स्थानिक नागरीक व शालेय विद्यार्थ्यांनी डम्पिंग विरोधात घोषणाबाजी केली. डम्पिंगवरील कचऱ्याला वारंवार आग लागून धुराचे साम्राज्य झाल्याने, हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील डम्पिंग ग्राऊंड हटाव मागणीसाठी व्यापारी, स्थायिक नागरिक व शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यावर, हिललाईन पोलिसांनी काही व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कारवाईचें संकेत पोलिसांनी दिले असून सायंकाळ पर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही. गुरवारी आमदार बालाजी किणीकर, शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने डम्पिंग ग्राऊंड बाबत महापालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन डम्पिंग ग्राऊंड वरील आगी बाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर शहरासाठी सामूहिक कचरा डम्पिंग ग्राऊंड बदलापूर येथे उभे राहत असल्याची माहिती दिली. लवकर डम्पिंग खुले झाल्यावर उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडची समस्या निकाली लागणार असल्याचे किणीकर म्हणाले.