मुलांच्या गुणात्मक करिअरमध्ये शाळा, शिक्षक यांचे मोठे योगदान : मधुरा वेलणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 03:50 PM2018-10-04T15:50:14+5:302018-10-04T15:52:21+5:30

उर्जा संस्थेद्वारे चला खेळू या नाटक -नाटक याउपक्रमाचा शुभारंभ पार पडला. 

School, Teacher's contribution to the quality of the children's qualitative career: Madhura Velankar | मुलांच्या गुणात्मक करिअरमध्ये शाळा, शिक्षक यांचे मोठे योगदान : मधुरा वेलणकर

मुलांच्या गुणात्मक करिअरमध्ये शाळा, शिक्षक यांचे मोठे योगदान : मधुरा वेलणकर

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांच्या गुणात्मक करिअरमध्ये शाळा, शिक्षक यांचे मोठे योगदान : मधुरा वेलणकरउर्जा संस्थेद्वारे चला खेळू या नाटक -नाटक याउपक्रमाचा शुभारंभमुलाचा व्यक्तिमत्व विकास नाटकाद्वारे सहज साध्य होईल - रूजुता देशमुख

ठाणे : मुलांचे करियर गुणात्मक दष्ट्या घडवण्यात शाळा, शिक्षक यांचे मोठे योगदान असल्याचे अभिनेञी मधुरा वेलणकर हिने पालकांना मार्गदर्शन करतेवळी सांगितले. 

चिञपट, मालिका पाहून लहान वयातच मुले नकळतपणे मोठी होत जातात. त्यांच्यातील भाबडेपणा कुठेतरी हरवत चालला आहे. त्यांच्यातील  हा भाबडेपणा मराठी भाषा बोलण्यातून , वाचनातून टिकवण्याचा प्रयत्न " चला खेळू या नाटक-नाटक"" या उपक्रमाद्वारे उर्जा संस्थेने हाती घेतला आहे. यामध्ये मुलच मराठी भाषेचे धडे, कविता यांचे सादरीकरण  नाट्यअभिनयातून साकारतील. यामुळे मुलाचा व्यक्तिमत्व विकास नाटकाद्वारे सहज साध्य होईल,असे मत अभिनेञी रूजुता देशमुख हीने व्यक्त केले. ब्राह्मण शिक्षण मंडळ संचलित घंटाळी येथील  कै. नंदकुमार जोशी इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी नाट्यभिनयाच्या माध्यमातून निर्माण व्हावी यासाठी  उर्जा संस्थेद्वारे चला खेळू या नाटक -नाटक याउपक्रमाचा शुभारंभ मंडळाचे अध्यक्ष द.श्री.बोरवणकर, उपाध्यक्षा नमिता सोमण, चिटणीस अँड.केदार जोशी, मुख्याध्यापिका पूनित दास, अपर्णा राँय यांच्या उपस्थित पार पडला. आमच्या वेळी बालनाट्यशिबिरे असायची ,बालनाटक असत.पण आताच्या मुलाना ती पाहयला मिळत नाही .ज्यावेळी  आईच्या भूमिकेतून हे दु:ख समजल.त्यावेळी आम्ही दोघीनी मिळून उर्जा संस्था सुरू केली .आणि त्याचे घोषवाक्य ,"चलाखेळू या नाटक -नाटकअसे ठेवण्यात आले.पुढच्या पीढीचे मराठी भाषेविषयी प्रेम,आवड कमी होताना दिसत आहे.मग ते टिकवण्यासाठी नाट्यशिबिराच्या ठिकाणी आवर्जून मराठी शब्दांचा वापर करण्यात येत असल्याचे ऱूजुता देशमुख हिने सांगितले.दरम्यान अभिनेञी मधुरा वेलणकर हिने मुलांना आपण नाटक नेहमीच करत असतो .उदादाखल तुम्ही शाळेत न येण्यासाठी खोटेपणाने आजारपणाचे नाटक करत असता कि नाही असे विचारल्यावर विद्यार्थीवर्गातून दबक्या आवाजात हो अशा  प्रतिक्रिया ऐकू आल्या. पण आपण दर आठवड्याला भाषेच्या पुस्तकातील एक धडा,एक कविता याचे वाचऩ नाटकाद्वारे करणार असून वर्षाच्या अखेरीस या आधारे एक नाटक बसवण्याची कल्पना मुलांसमोर मांडली .आणि मुलानीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उचलून धरली. तर यावेळी पालकांशी संवाद साधताना रंगीबेरंगी फुग्यामधील काळ्या रंगाच्या फुग्याचे महत्व पटवून दिले.फुगा हवेत झेपावताना तो त्याच्या रंगामुळे उडत नसून त्यामधील हवा कशा पध्दतीने भरण्यात आली आहे.त्यानुसार तो आकाशात उंचावत असतो.त्याचप्रमाणे येथील शाळा,शिक्षक जे मुलांवर कष्ट घेत आहेत,त्यांच्यावर संस्कार करीत आहेत त्यामुळेच त्याच्या करीयरची तो यशस्वी झेप  घेण्यास तयार झाला असल्याचे मधुरा वेलणकर हिने सांगितले .यावेळी चिटणीस अँड. जोशी यांनी सध्या भाषेमधील व्याकरणाची जी गंमत आहे. ती या परिक्षार्थी स्पर्धेच्या मार्कात मागे पडली असल्याची खंत व्यक्त केली.

Web Title: School, Teacher's contribution to the quality of the children's qualitative career: Madhura Velankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.