डोंबिवली वाहतूक पोलिस ठाण्यात भंगार वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 05:25 PM2018-01-15T17:25:24+5:302018-01-15T17:28:54+5:30

वाहतूक नियंत्रण पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी कारवाई करुन जप्त केलेल्या वाहनांना डोंबिवली पूर्वेला रामनगर पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले आहे. पुढे त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुमारे ५० हून अधिक वाहने भंगारात जमा झाली आहेत. ती अडगळ वाढल्याने त्या वाहनांचे नेमके काय करावे हा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला असून आगामी २६ जानेवारी रोजी होणा-या प्रजासत्ताक दिनाला अडथळा होणार आहे.

Scrape vehicles in Dombivli Traffic Police Station | डोंबिवली वाहतूक पोलिस ठाण्यात भंगार वाहने

डोंबिवली वाहतूक पोलिस ठाण्यात भंगार वाहने

googlenewsNext
ठळक मुद्दे पोलिसांसह कर्मचा-यांचे आरोग्य धोक्यातपत्रव्यवहार करुनही आरटीओचा कानाडोळा

डोंबिवली: वाहतूक नियंत्रण पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी कारवाई करुन जप्त केलेल्या वाहनांना डोंबिवली पूर्वेला रामनगर पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले आहे. पुढे त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुमारे ५० हून अधिक वाहने भंगारात जमा झाली आहेत. ती अडगळ वाढल्याने त्या वाहनांचे नेमके काय करावे हा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला असून आगामी २६ जानेवारी रोजी होणा-या प्रजासत्ताक दिनाला अडथळा होणार आहे.
वाहने धुळखात पडल्यामुळे त्यात पावसाचे पाणी, धुळ साठते. परिसरातील झाडांचा पालापाचोळा त्यातच पडतो, परिणामी पोलिसांसह अन्य कर्मचा-यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. महिनोंमहिने ती वाहने तशीच पडल्याने वाहतूक पोलिसांची टोर्इंग व्हॅन जी कारवाई करते त्या गाड्यांना ठेवायलाही त्या ठिकाणी जागा नाही, परिणामी टोर्इंग कारवाईला देखिल मर्यादा येत आहेत. नो पार्किंग तसेच अवैधपणे पार्क केलेल्या गाड्या आणल्यावर त्या नेमक्या ठेवायच्या कुठे असा सवाल वाहतूक पोलिसांना पडतो. त्यामुळे समस्या गंभीर झाली आहे.
वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी ती वाहने कल्याण आरटीओ कार्यालयात अथवा अन्य जेथे सोय करण्यात आली आहे, त्या ठिकाणी वाहने न्यावीत, भंगार वाहनांसंदर्भात लिलाव करावा असे आवाहन पत्र वेळोवेळी दिले आहे. पण त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले. सोमवारीही त्यांनी स्मरणपत्र दिल्याचे सांगण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांनी संबंधितांना सूचित केले असूनही कार्यवाही मात्र न झाल्याचे गंभीरे म्हणाले. लवकरच ती कार्यवाही व्हावी, जागा मोकळी करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
''जप्तीची कारवाई केलेली वाहने त्या ठिकाणी असल्याचे पत्र मिळाले असून त्याचा लिलाव करण्यासाठी आॅक्शन चा प्रस्ताव विचाराधीन असून २६ जानेवारी रोजी त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन होणार असेल तर त्यावर तातडीने तोडगा काढला जाईल'' - संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

Web Title: Scrape vehicles in Dombivli Traffic Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.