कल्याणमध्ये कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:41 AM2021-04-01T04:41:21+5:302021-04-01T04:41:21+5:30
---------------- व्यापाऱ्याची २२ लाखांची फसवणूक कल्याण : जहीर शेख हे भाजीपाला व्यापारी असून, यांची शेख ब्रदर्स फर्म आहे. या ...
----------------
व्यापाऱ्याची २२ लाखांची फसवणूक
कल्याण : जहीर शेख हे भाजीपाला व्यापारी असून, यांची शेख ब्रदर्स फर्म आहे. या फर्मच्या नावे २१ बनावट पावत्या तयार करून २२ लाख ८४ हजार ८३६ रुपये किमतीचे टोमॅटो खरेदी करण्यात आले. फर्मचे नाव वापरून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हनुमान नाझिरकर आणि संगीता नाझिरकर यांच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. २ एप्रिल २०१४ ते २९ मार्च २०२१ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
---------
रिक्षा चोरीला
डोंबिवली : हेमंत भागवत यांनी त्यांची रिक्षा पूर्वेतील पाथर्ली, शिवमंदिरासमोर पार्क केली होती. तेथून ती रिक्षा चोरीला गेल्याची घटना रविवारी रात्री ९.३० ते ११.४५ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-------------------------------------------
दुचाकीला आग
कल्याण : पश्चिमेतील चिकणघर परिसरातील हनुमान भोईर चाळ, मोठा म्हसोबा मैदानाजवळ उभ्या केलेल्या दुचाकीला कोणीतरी आग लावून तिचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी पहाटे ४.३० च्या दरम्यान घडली. या प्रकरणी दुचाकीमालक धनंजय भिवडे यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------------------
कल्याणमध्ये रिक्षाचोरी
कल्याण : पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातील मौलवी कंपाउंडमध्ये राहणारे अन्वर खान यांनी त्यांची रिक्षा घराजवळ उभी केली होती. तेथून ती बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------
१६ लाखांची फसवणूक
डोंबिवली : नवापाडामधील गौरीसदन बिल्डिंगमधील वैशाली पटणे यांच्या मालकीचे दोन ब्लॉक विकसित झाल्यानंतर ते त्यांच्या नावे नोंदणीकृत करण्यात आले नाहीत. ते ब्लॉक परस्पर दिनेश सावंत यांना विकून १६ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अशोक शिरोसे, संजय खरात, अरुण जयस्वाल, कल्पेश बेडेकर, राकेश परमार, आशिष मुंडे यांच्याविरोधात विष्णूनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------