भाईंदर वरून विरार आणि पालघर पर्यंत जाणार सीलिंक - मुख्यमंत्री शिंदे

By धीरज परब | Published: July 2, 2023 09:12 PM2023-07-02T21:12:36+5:302023-07-02T21:12:45+5:30

आयुक्त ढोले यांनी विकासकामांची माहिती देत स्टील उद्योग विकासासाठी क्लस्टर चा पर्याय मांडला .  

Sealink from Bhayandar to Virar and Palghar - CM Shinde | भाईंदर वरून विरार आणि पालघर पर्यंत जाणार सीलिंक - मुख्यमंत्री शिंदे

भाईंदर वरून विरार आणि पालघर पर्यंत जाणार सीलिंक - मुख्यमंत्री शिंदे

googlenewsNext

मीरारोड -  मुंबईचा सीलिंक हा भाईंदर व पुढे विरार आणि पालघर पर्यंत नेणार आहोत . त्यामुळे मुंबईतुन निघालेला माणूस सुसाट पालघरला पोहचणार . बुलेट ट्रेन - मेट्रोचे काम सुरु केले असून मेट्रोचे ३५० किमी चे नेटवर्क होत असल्याने वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले . रोज  शिवसेना - भाजप सरकार पडणार सांगत कुंडली बघणाऱ्यांचे ज्योतिषी कोण आहेत माहित नाही ? असा टोला लगावत आता सरकारचे काम पाहून अजित पवार व सहकाऱ्यांनी पाठिंबा दिल्याने सरकार आणखी भक्कम झाल्याचे शिंदे म्हणाले . 

मीरा भाईंदर शहरातील सिमेंट काँक्रीट रस्ते , सूर्या पाणी योजनेसाठी अंतर्गत वितरण व्यवस्था,  मीरारोडच्या आरक्षण २४८ मध्ये सद्गुरू सदानंद महाराज सभागृह व कै . हरिश्चंद्र आमगावकर जिम , भूमिगत गटार योजना टप्पा २ आदी कामांचे भूमिपूजन तसेच आमदार निधीतून आरोग्य तपासणी व्हॅन , हवेची गुणवत्ता सुधारणा प्रकल्प , काशीमीरा प्रभाग समिती ६ च्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इमारत , इंद्रलोक शाळा इमारत, भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक प्रवेशद्वार , घोडबंदर किल्ला प्रवेशद्वार व वसईच्या माणिकपूर पोलीस ठाणे नूतन इमारत आदी कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले . रविवारी लता मंगेशकर नाट्यगृहात सकाळी ११ वा. ठरलेला कार्यक्रम राज्यातील राजकीय घडामोडी मुळे सायंकाळी ६ च्या सुमारास सुरु झाला . 

यावेळी बालयोगी सदानंद महाराज, खासदार राजेंद्र गावित , आमदार प्रताप सरनाईक , गीता जैन व भरत गोगावले , जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , पोलीस आयुक्त मधुकर पांडेय , महापालिका आयुक्त दिलीप ढोले, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक ,  शिवसेना जिल्हा प्रमुख राजू भोईर , भाजप जिल्हाध्यक्ष ऍड . रवी व्यास , पूर्वेश सरनाईक ,  अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर , शहर अभियंता दिपक खांबित आदी उपस्थित होते . आ . जैन यांनी टोल नाका हटवणे , बायो डायव्हर्सिटी पार्क , दहिसर - भाईंदर लिंक मार्ग आदी मुद्दे उपस्थित केले . आयुक्त ढोले यांनी विकासकामांची माहिती देत स्टील उद्योग विकासासाठी क्लस्टर चा पर्याय मांडला .  

मुख्यमंत्री होताच शिंदे यांनी मीरा भाईंदरच्या विकासासाठी आता पर्यंतच्या शहराच्या इतिहासातील सर्वात जास्त निधी दिला आहे असे सांगत डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन , हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व तरण तलावच्या कामाला निधी  व एमएमआरडीएची भाडे तत्त्वावरील घरे पडून असल्याने ती महापालिका देण्याची मागणी  आ . सरनाईक यांनी केली असता ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली . 

सामान्य जनतेचे हे सरकार आहे . सर्वच नागरिकांच्या मोफत उपचारासाठी ५  लाखांची योजना केली . महिला , मुली , ज्येष्ठ नागरिक , शेतकरी अश्या समाजातली विविध घटकांसाठी योजना आणल्या .  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे राज्याला मदत करत आहेत . म्हणून सर्वांगीण विकास होत आहे . रखडलेले प्रकल्प पुढे नेत  आहोत . 

आ . सरनाईक यांनी लोकांच्या हिताची भरपूर कामे मंजूर करून घेतली.  विविध समाजासाठी भवने बांधणारी हि पहिली महापालिका आहे . वाढत्या शहराच्या गरजा वाढत्या आहेत . त्यामुळे शासना कडून निधी कमी पडणार नाही . बाळासाहेब व दिघे साहेबांनी द्यायलाच शिकवले आहे. सदानंद महाराजांनी लोकांचे आयुष्य बदलण्याचे कार्य चालवले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले . 

Web Title: Sealink from Bhayandar to Virar and Palghar - CM Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.