बंधाऱ्यांसाठी ४५ लाख रिकाम्या गोण्यांची शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:02 AM2019-10-01T02:02:33+5:302019-10-01T02:02:52+5:30

ठाणे जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे.

 Search for 45 lakh empty shells for hostages | बंधाऱ्यांसाठी ४५ लाख रिकाम्या गोण्यांची शोधाशोध

बंधाऱ्यांसाठी ४५ लाख रिकाम्या गोण्यांची शोधाशोध

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास वेळीच अडवून पाणीटंचाई दूर करण्यासह रब्बी पिकांसाठी त्याचा वापर करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या ४५ लाख गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून (जि.प.) शोधाशोध सुरू झाली आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आदी महानगरांना पाणीपुरवठा करणाºया ठाणे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांतील ग्रामीण जनता तीव्र पाणीटंचाईला तोंड देते. या समस्येवर काही प्रमाणात मात करण्यासाठी सध्या वाहत असलेल्या छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी वेळीच अडवण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. यासाठी नदी, नाले, ओढ्यांवर बांधण्यात येणाºया वनराई बंधाऱ्यांचे ठिकाण शोधण्यासाठी यंत्रणा जिल्ह्यात सतर्क झाली आहे. याशिवाय, त्यासाठी लागणाºया गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, बिल्डर्स असोसिएशन, कंत्राटदार, जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या यंत्रणा, नगरपालिका, नगर परिषदा, कंपन्या आदींशी संपर्क साधून सिमेंटच्या रिकाम्या गोण्या देण्याचे लेखी आवाहन केल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी लोकमतला सांगितले.

साडेचार हजार वनराई बंधा-यांचे नियोजन
या ४५ लाख रिकाम्या गोण्यांमध्ये माती भरून त्या वाहत्या पाण्यात एकावर एक ठेवून लांब बंधारा बांधला जाणार आहे. जिल्हाभरात स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागातून तब्बल चार हजार ५०० वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी एक हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजन केले. भिवंडीला एक हजार आणि कल्याण, अंबरनाथ तालुक्यांत प्रत्येकी २५० वनराई बंधारे बांधण्यासाठी लागणाºया ठिकाणांचा शोध पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या माध्यमातून घेतला जात आहे. निवडणूक संपताच हा उपक्रम युद्धपातळीवर राबवण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

भूगर्भातील पाणीसाठा टिकवणार
या वनराई बंधाºयांमुळे उन्हाळ्यात उद्भवणाºया पाणीटंचाईला काहीअंशी आळा घालणे शक्य होणार आहे. याशिवाय, दैनंदिन वापरासह गुरंढोरं, वन्य पशुपक्षी आदींना या वनराई बंधाºयातील पाणी नवसंजीवनी देणार आहे. शेतकºयांना भेंडीसारख्या नगदी रब्बी पिकांप्रमाणेच पालेभाज्यांचे उत्पन्न सहज घेता येईल. याकरिता या बंधाºयांतील पाण्याचा वापर उपयुक्त ठरणार आहे. विहिरींमधील पाण्याची पातळी वाढण्यासह भूगर्भातील पाणीसाठा टिकवून ठेवता येणार आहे.

विद्यार्थ्यांचा सहभाग घेणार
या नवसंजीवनी देणा-या उपक्रमासाठी स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागाप्रमाणेच ठाणे, मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी आदी विद्यार्थी संघटना, उद्योगधंदे, कारखाने, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, राजकीय संघटना, शिक्षक संघटना आदींचा सहभाग घेऊन वनराई बंधाºयांची निर्मिती करण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषदेने केले आहे.

Web Title:  Search for 45 lakh empty shells for hostages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे