केंद्राच्या योजना लाभार्थ्यांचा शोध;गरजूंपर्यंत जाण्यासाठी जिल्ह्यात 'विकसीत भारत संकल्प यात्रा!

By सुरेश लोखंडे | Published: November 16, 2023 05:21 PM2023-11-16T17:21:46+5:302023-11-16T17:23:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात मोहीम राबविली जाणार.

Search of scheme beneficiaries of the center "Developed Bharat Sankalp Yatra" in thane district | केंद्राच्या योजना लाभार्थ्यांचा शोध;गरजूंपर्यंत जाण्यासाठी जिल्ह्यात 'विकसीत भारत संकल्प यात्रा!

केंद्राच्या योजना लाभार्थ्यांचा शोध;गरजूंपर्यंत जाण्यासाठी जिल्ह्यात 'विकसीत भारत संकल्प यात्रा!

ठाणे : जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्या लाभार्थ्यास त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे आदीसाठी जिल्ह्यातत आजपासून २६ जानेवारीपर्यंत केंद्र शासनाकडून “विकसित भारत संकल्प यात्रा” आयोजित केली आहे. या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्यातही झाला आहे. त्यास अनुसरून नीती आयोगाच्या संचालक जागृती सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात विविध शासकीय विभागांचा आढावा व लेखाजोखा आज घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. प्रत्येक गरजू भारतीय लाभार्थ्याचा शोध घेवून गरजू, पात्र लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी ही संकल्प यात्रा जिल्ह्यात सुरू झाली आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. यातूनच शासन आणि लाभार्थींमधील सुसंवाद आणखी दृढ होईल. यासाठी प्रत्येक शासकीय विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत झोकून देवून उत्साहाने काम करणे, अपेक्षित आहे, अशी अपेक्षा सिंगला यांनी यावेळी उपस्थितांकडून केली आहे.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, कल्याण महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे आदी अधिाकरी यावेळी उपस्थित हाेते.

 जिल्हाधिकारीरे म्हणाले की, “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी माेहिमेत प्रत्येक विभागाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्साहाने कामाला लागावे लाभार्थ्यास त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याना मार्गदर्शन केले.


यात्रेची उद्दिष्टे - विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद- वैयक्तिक यशकथा, अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्याची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत.

Web Title: Search of scheme beneficiaries of the center "Developed Bharat Sankalp Yatra" in thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.