जिल्हाधिकाऱ्यांसह ६२ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:01+5:302021-04-04T04:42:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हाधिकारी राजेश ...

The second dose of Corona vaccine was taken by 62,000 officers and employees including the District Collector | जिल्हाधिकाऱ्यांसह ६२ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

जिल्हाधिकाऱ्यांसह ६२ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक पहिला डोस घेतला होता. त्यानंतर शनिवारी त्यांनी दुसरा डोस घेऊन लसीकरणाचे दोन्ही डोस यशस्वीरीत्या पूर्ण केले. याप्रमाणे जिल्ह्यातील अन्यही ६१ हजार ९९६ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि अन्य नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक दुसरा डोस घेऊन कोरोनाच्या संकटावरील मळभ हलके केले.

येथील सिव्हिल रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांनी या लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित केल्याचे ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जिल्ह्यातील तीन हजार ४४२ लसीकरण केंद्रांवर आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पहिल्या फळीतील दोन लाख ६९ हजार ६१३ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. ६१ हजार ९९६ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कोरोना प्रतिबंधात्मकचा दुसरा डोस यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील ७० हजार ५९५ डॉक्टर, परिचारिका आदींनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी ३६ हजार ८९३ जणांनी त्यांचा दुसरा डोसही संबंधित लसीकरण केंद्रांवर जाऊन आतापर्यंत पूर्ण केलेला आहे. याप्रमाणेच पहिल्या फळीतील पोलीस यंत्रणेतील ५२ हजार ४६२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून, तब्बल २४ हजार ३० जणांनी या लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे.

याप्रमाणेच ४५ ते ६० वर्षे वयोगटातील २५ हजार १६० नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस जिल्हाभरातून घेतला आहे. तर, यापैकी अवघ्या १९१ जणांनी त्यांचा दुसरा डोस घेतला आहे. याशिवाय ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील एक लाख २१ हजार ३९६ ज्येष्ठांनी त्यांचा पहिला डोस घेतला आहे. यापैकी ८८२ ज्येष्ठांनी आतापर्यंत दुसरा डोस घेऊन कोरोनाला पळवून लावण्यास सज्जता दाखवली आहे.

Web Title: The second dose of Corona vaccine was taken by 62,000 officers and employees including the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.