ठाण्यात १०० ज्येष्ठांना ‘ड्राइव्ह इन’ अंतर्गत लसीकरणाचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:19+5:302021-05-13T04:41:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात विविनाना मॉलच्या पार्किंगमध्ये ‘ड्राइव्ह इन’ सुविधेंतर्गत महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात विविनाना मॉलच्या पार्किंगमध्ये ‘ड्राइव्ह इन’ सुविधेंतर्गत महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेविका आशा डोंगरे उपस्थित होत्या.
या सुविधेंतर्गत रोज नोंदणी केलेल्या १०० ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ दुसरा डोस देण्यात येणार आहे. हे लसीकरण दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात येणार आहे.
ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असून फक्त दुसरा डोसच या केंद्रावर घेता येणार आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे.