परकीय चलनाचे प्रलोभन दाखवून दोन लाखांची फसवणूक पाच दिवसातील दुसरी घटना
By कुमार बडदे | Updated: April 15, 2023 17:52 IST2023-04-15T17:52:16+5:302023-04-15T17:52:29+5:30
परकीय चलनाचे प्रलोभन दाखवून एका कार चालकाची २ लाख रुपायांची फसवणूक करण्यात आली.

परकीय चलनाचे प्रलोभन दाखवून दोन लाखांची फसवणूक पाच दिवसातील दुसरी घटना
मुंब्राः परकीय चलनाचे प्रलोभन दाखवून एका कार चालकाची २ लाख रुपायांची फसवणूक करण्यात आली.मागील पाच दिवसात दिवा शहरात अशा प्रकारची दुसरी घटना घडली आहे.याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारी वरुन फसवणूक केलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषां विरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई शहरातील विर्लेपार्ले या उपनगरात रहात असलेल्या संजीभ जहाँ या चालकाला दिवा रेल्वे स्थानका जवळ भेटलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांनी त्याच्याकडे १५० अमेरिकन डाँलर असल्यचे त्यांना खोटे सागितले.आणि त्या बदल्यात जहाँ यांच्या कडून भारतीय चलनातील २ लाख रुपये घेऊन त्यांना अमेरिकन डाँलर म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदी पेपरचे बंडल बाधून दिले.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जहाँ यांनी याबाबत मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.