‘पॉज’ची दुसऱ्या टप्प्यात ४२ श्वानांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:16+5:302021-05-15T04:38:16+5:30

डोंबिवली : प्लाँट्स ॲण्ड वेल्फेअर सोसायटीने (पॉज) दुसऱ्या टप्प्यात बदलापूर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकातील ४२ भटक्या श्वानांचे ...

In the second phase of 'Pause', 42 dogs were vaccinated | ‘पॉज’ची दुसऱ्या टप्प्यात ४२ श्वानांना लस

‘पॉज’ची दुसऱ्या टप्प्यात ४२ श्वानांना लस

Next

डोंबिवली : प्लाँट्स ॲण्ड वेल्फेअर सोसायटीने (पॉज) दुसऱ्या टप्प्यात बदलापूर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकातील ४२ भटक्या श्वानांचे लसीकरण केले. यावेळी श्वानांना रॅबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. दरम्यान, ‘पॉज’ सलग सातव्या वर्षी ही लसीकरण मोहीम राबवत आहे.

मे महिन्यातील उन्हाळ्यामुळे रस्त्यावर फिरणारे भटक श्वान शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे ‘पॉज’चे स्वयंसेवक रात्री श्वानांचे लसीकरण करत आहेत. पहिल्या टप्प्यात ठाकुर्ली ते कोपर, तर दुसऱ्या टप्प्यात बदलापूर ते विठ्ठलवाडी स्थानकातील भटक्या श्वानांना रॅबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. राज मारू यांनी ही मोहीम राबवली. कल्याण-डोंबिवली परिसर हा रेबीजमुक्त करण्याचा प्रयत्न असून काही प्रमाणात ते शक्य झाल्याचा दावा संस्थेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी केला आहे.

--------------

Web Title: In the second phase of 'Pause', 42 dogs were vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.