कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणेकरांचा कल ‘डाएट’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:35 AM2021-05-03T04:35:13+5:302021-05-03T04:35:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणेकर डाएटविषयी अधिक सजग हाेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी चांगल्या आहाराच्या ...

In the second wave of Corona, Thanekar's tendency is towards 'diet' | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणेकरांचा कल ‘डाएट’कडे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणेकरांचा कल ‘डाएट’कडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणेकर डाएटविषयी अधिक सजग हाेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी चांगल्या आहाराच्या सल्ल्यासाठी आहारतज्ज्ञांकडे धाव घेण्यास सुरू केल्याने आगावू बुकिंग सुरू झाले आहे. यामध्ये पाेस्ट काेविड डाएड घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच वजन कमी करण्याच्या डाएटपेक्षा राेगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या डाएटकडे लाेकांचा कल वाढला आहे. यामुळे अनेकजण मूळ भारतीय आहाराकडे वळत असल्याने त्याबाबत जनजागृती हाेत असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये बेकिंग आणि कुकिंगचा ट्रेण्ड होता. जो तो नवनवीन पदार्थ बनवून खात होता. त्याचे दुष्परिणाम म्हणजे वजन वाढत गेले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये डाएट हा विषयच पूर्ण बाजूला राहिला होता. डाएट केल्याने वजन कमी होऊन प्रतिकारशक्ती कमी होईल आणि कोरोना होईल हा गैरसमज होता. दुसऱ्या लाटेत लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्याचे दिसत आहे, असे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. दीपाली आठवले यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ज्यांना आधीपासूनच रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड आहे आणि कोरोना झाला तर आणखीन त्रास अशी भीती ज्यांना वाटत आहे, ते लोक निरोगी आहारशैलीकडे वळत आहेत. कोरोनातून बरा झालेला माणूस आतून हादरला आहे. श्वास घ्यायला त्रास होणे, वजन वाढणे, औषधांचे साइड इफेक्ट्स यातून बाहेर येण्यासाठी तो डाएटचा आधार घेत आहे. पोस्ट कोविड डाएट घेणारे आणि त्यातही ऑनलाइन सल्ला घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती डॉ. आठवले यांनी नोंदविली.

-------------

३० टक्क्यांनी संख्या वाढली

- दुसऱ्या लाटेनंतर आहाराच्या सल्ल्यासाठी येणाऱ्यांची संख्या २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. डाएटकडे ३५ ते ५० वर्षे वयोगटातील वर्ग वळत आहे.

- पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक असून, त्यात जोडप्यांची डाएटकडे येण्याची संख्या अधिक आहे.

--

यातून मिळते ‘क’ जीवनसत्त्व

‘क’ जीवनसत्त्व मिळविण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचा नुसता भडिमार सुरू आहे. पण सध्याच्या काळात आंबा हे सर्वाधिक ‘क’ जीवनसत्त्व देणारे फळ आहे. त्याचबरोबर लिंबू, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आवळाही खाऊ शकता, असा सल्ला डॉ. आठवले यांनी दिला.

------------------

पहिल्या लॉकडाऊनमध्ये नवनवीन पदार्थ बनविले जात होते. त्यामुळे आमचे वजन वाढत गेले. कोरोनामुळे डाएट आणि व्यायामाचे महत्त्व पटल्यामुळे आम्ही दोघे डाएट करीत आहोत. तसेच जिमचीही कपल मेम्बरशिप घेतली आहे.

- मनीषा अजित

Web Title: In the second wave of Corona, Thanekar's tendency is towards 'diet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.