ठाण्यात महागाईला कंटाळून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:05 PM2018-09-28T22:05:59+5:302018-09-28T22:11:00+5:30

एकीकडे ग्रामीण भागातील शेतकरी कर्जबाजारीपणा आणि वाढत्या महागाईने हैराण असतांनाच शहरी भागातही आता महागाईमुळे हैराण झालेल्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या वर्तकनगर भागात घडली. पगार आणि वाढती महागाई यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे पत्नीशी झालेल्या भांडणातून किशोर जनाला याने हे टोकाचे पाऊल उचलले.

Security guard committed suicide in Thane | ठाण्यात महागाईला कंटाळून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

पगार आणि वाढती महागाई यांचा ताळमेळ बसेना

googlenewsNext
ठळक मुद्देउपवन परिसरातील घटनापगार आणि वाढती महागाई यांचा ताळमेळ बसेनावारंवार होत होते पत्नीशी वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाढती महागाई आणि त्याचा अपुरा पगार यातून पत्नीशी झालेल्या भांडणातून किशोर जनाला (५५) या सुरक्षारक्षकाने उपवन परिसरातील एका झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मूळ नेपाळचा रहिवासी असलेला किशोर ठाण्याच्या शिवाईनगरातील ‘अथर्व पार्क’ सोसायटीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरक्षारक्षकाचे काम करतो. त्याचा त्याच्या पत्नीबरोबर घरगुती कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद होता. वाढती महागाई आणि त्याचा अपुरा पगार यातूनही त्यांच्यात खटके उडत होते. गुरुवारीही त्यांच्यात असाच वाद झाला. त्यामुळेच गुरुवारी दुपारी तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर, शुक्रवारी सकाळी ८ ते ९ वा.च्या दरम्यान उपवन परिसरातील पायलादेवी मंदिराच्या मागील एका झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुलगा दीपक (२२) याच्याकडे सायंकाळी स्वाधीन केल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.

Web Title: Security guard committed suicide in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.