ठाण्यातील ज्वेलर्सच्या खून प्रकरणात सोसायटीचा सुरक्षा रक्षकच निघाला सूत्रधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:15 PM2021-08-26T22:15:16+5:302021-08-26T22:17:26+5:30
एक आठवडयांपूर्वी चरईतील भरत जैन यांचे घरी पायी जातांना रिव्हॉल्व्हरच्या धााकावर अपरहरण करुन नंतर दुकानातील चांदीच्या भांडयांची लूट करणाऱ्या अतुल मिश्रा या सुरक्षा रक्षकासह चौघांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाशा अंबुरे यांनी गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एक आठवडयांपूर्वी चरईतील भरत जैन यांचे घरी पायी जातांना रिव्हॉल्व्हरच्या धााकावर अपरहरण करुन नंतर दुकानातील चांदीच्या भांडयांची लूट करणाऱ्या अतुल मिश्रा या सुरक्षा रक्षकासह चौघांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाशा अंबुरे यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून एक लाख २४ हजारांची दोन किलोची चांदीची भांडी जप्त केली आहेत. सुरक्षा रक्षकाला ओळखल्यानंतर आपले भिंग फुटू नये, म्हणूनच त्याने जैन यांची हत्या केल्याचीही बाब समोर आल्याचे अंबुरे यांनी सांगितले.
ठाण्यातील मखमली तलाव, नीलकंठ सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेल्या जैन यांच्या अपहरणानंतर हत्या झाल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यामुळे ठाण्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जैन यांच्या कुटूंबीयांनीही घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर याप्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत होता. दरम्यान, कळवा खाडीत जैन यांचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत मिळाल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले होते. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अंबुरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांची दोन पथके तयार केली होती. सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला जैन यांचे दुकान तसेच परिसरातील १६ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेºयातील फूटेजची पडताळणी करण्यात आली. यातील व्हॅगनर मोटारकारजवळ घुटमळतांना आढळलेल्या नवी मुंबईतील घणसोलीतील सुभाष सुर्वे याला या पथकाने ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने साथीदार अतुल मिश्रा तसेच निलेश भोईर यांच्याशी संगनमत करुन जैन यांच्याकडे टाकलेल्या दरोडा आणि खूनाची कबूली दिली.
अतुल हा जैन वास्तव्याला असलेल्या सोसायटीत अडीच वर्षापूर्वी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होता. त्यामुळे त्याला जैन यांच्या दुकानाची तसेच त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळांची माहिती होती. यातूनच कट रचून त्याने १४ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मखमली तलाव भागातून पायी जाणाºया जैन यांना रिव्हॉल्व्हरचा ध्व्यापारी भरत जैन हत्याकांडातील एक आरोपी होता सचिन वाझे यांचा चालक