मीरा-भाईंदरमध्येही लॉजची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:12 AM2020-09-07T00:12:22+5:302020-09-07T00:12:31+5:30

- धीरज परब मीरा रोड : राज्य सरकारने लॉज सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी कोरोनाच्या अनुषंगाने मात्र आवश्यक ...

The security of the lodge in Mira Bhayandar is also in the air | मीरा-भाईंदरमध्येही लॉजची सुरक्षा वाऱ्यावर

मीरा-भाईंदरमध्येही लॉजची सुरक्षा वाऱ्यावर

googlenewsNext

- धीरज परब

मीरा रोड : राज्य सरकारने लॉज सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी कोरोनाच्या अनुषंगाने मात्र आवश्यक उपाययोजना लॉजमध्ये केल्या जात नाहीत. अनैतिक व्यवसायासाठी प्रसिद्ध लॉजमध्ये तर जोडप्यांच्या वर्दळीपासून वारांगनापुरवठ्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने कोरोना संसर्ग वाढण्याचा धोकादेखील वाढला आहे.

मीरा-भार्इंदर हे कोणतेही पर्यटनस्थळ वा मोठे उद्योगक्षेत्र नसले, तरी शहरात लॉजची संख्या मोठी आहे. शहरातील काही मोजकीच मोठी हॉटेल दर्जा टिकवून असून त्या ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने सॅनिटायझर, मास्क व खोल्यांच्या सॅनिटायझेशनसह आतील चादरी बदलण्याचे निर्देश पाळले जात आहेत. येणाºया ग्राहकांची तपासणी व नोंदणी केली जात आहे.

परंतु, शहरातील असंख्य लहान व अनैतिक व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या लॉजमध्ये तर कोरोनासाठीचे दिलेले निर्देश धाब्यावर बसवले जात आहेत. अशा लॉजमध्ये जोडपी वा वेश्या व्यवसायासाठी येणाºया वारांगनांना शॉर्टटाइमसाठी खोल्या कोणतीही कोरोना संसर्गाची खबरदारी न घेताच भाड्याने दिल्या जात आहेत. केवळ अशा अनैतिक व्यवसायावरच या लॉजचालकांचा व्यवसाय असल्याने ग्राहक गेल्यावर चादरी बदलणे, सॅनिटायझेशन करणे आदी उपाययोजनाच केल्या जात नाहीत, असे आढळून आले. त्यातही अशा लॉजवाल्यांचा व्यवसाय तेजीत आहे.

सरकारने लॉजचालकांना परवानगी देताना कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून कायकाय उपाययोजना करायच्या, काय काळजी घ्यायची, याचे सविस्तर निर्देश दिलेले आहेत. परंतु, लॉजचालक व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे काटेकोर पालनच केले जात नसताना दुसरीकडे या सर्व गोष्टींची नियमित पडताळणी पालिका वा पोलीस स्तरावरून झाली पाहिजे, ती होताना दिसत नाही. सूत्रांनी सांगितले की, काही लॉजमधून पूर्वीप्रमाणेच वारांगनापुरवण्यासह मद्य आदी नशेच्या वस्तूही वेटरमार्फत पुरवल्या जात आहेत.

तपासणीकडे केले जाते दुर्लक्ष

स्थानिक पोलिसांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा व महापालिका प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांची जबाबदारी असूनही अशा लॉजची काटेकोर अचानक तपासणी आदी प्रकारच होत नसल्याने अशा लॉजवर नियंत्रण ठेवायचे तरी कोणी, असा प्रश्न केला जात आहे. लॉजमधून अनैतिक व्यवसायासह कोरोनाचा संसर्ग पसरल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: The security of the lodge in Mira Bhayandar is also in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.