मुरबाड पंचायत समितीची सुरक्षा वाऱ्यावर, तळीरामांचा वावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 12:07 AM2019-07-14T00:07:31+5:302019-07-14T00:07:44+5:30

मुरबाड पंचायत समितीत सुटीच्या दिवशी कार्यालयात येणारे फोन किंवा टपाल घेण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते.

 Security of Mumbaik Panchayat Samiti | मुरबाड पंचायत समितीची सुरक्षा वाऱ्यावर, तळीरामांचा वावर

मुरबाड पंचायत समितीची सुरक्षा वाऱ्यावर, तळीरामांचा वावर

Next

- श्याम राऊत
मुरबाड : मुरबाड पंचायत समितीत सुटीच्या दिवशी कार्यालयात येणारे फोन किंवा टपाल घेण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, एवढ्या मोठ्या कार्यालयात एकट्याच असलेल्या महिला व अपंग कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी कुणीच नसल्याने कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुरबाड नगरपंचायतीने शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय केलेली नाही. मुरबाडमधील शिवाजी चौक ते काँग्रेस भवन या परिसरातील व्यापारी, फेरीवाले तसेच बाजारात खरेदीसाठी येणारे नागरिक हे लघुशंका, प्रातर्विधीसाठी पंचायत समितीच्या कार्यालयातील स्वच्छतागृहांत येतात. कार्यालय सुरू असतानाही या नागरिकांचा पंचायत समितीत वावर असतो. दरम्यान, सायंकाळी साडेपाचनंतर व सुटीच्या दिवशी कार्यालयात येणारे वरिष्ठ कार्यालयाचे दूरध्वनी तसेच तातडीचे टपाल स्वीकारण्यासाठी पंचायत समितीकडून महिला व अपंग कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नसल्याने कार्यालयात लघुशंकेचे निमित्त करून तळीरामांचे टोळके तसेच रोडरोमिओ विनापरवानगी प्रवेश करतात. त्यांना रोखण्यापेक्षा कार्यालयातून बाहेर जाणे महिला कर्मचारी पसंत करतात. परंतु, आपण जर बाहेर गेलो तर हे टोळके किंवा रोडरोमिओ एखादी फाइल घेऊन गेले तर काय होईल, या विवंचनेत हे कर्मचारी असतात.
महत्वाची कादगपत्रे चोरीला गेली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. तेव्हा प्रशासनाने तातडीने येथे सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
>सुटीच्या दिवशी कामाचा ताण कमी असल्याने महिला व अपंग कर्मचाºयांची कार्यालयात नियुक्ती केली जाते. परंतु, त्यांना जर नागरिकांचा अशा प्रकारे उपद्रव सहन करावा लागत असेल, तर त्यावर योग्य ती उपाययोजना केली जाईल.
- विश्वनाथ केळकर, गटविकास अधिकारी
पंचायत समितीने एकटी महिला किंवा अपंग कर्मचाºयाची नियुक्ती न करता काही चतुर्थश्रेणी पुरुष कर्मचारी तसेच बांधकाम विभागातील कर्मचाºयांना या महिला, अपंग कर्मचाºयांसोबत ठेवले तर तळीराम, रोडरोमिओंच्या दहशतीखाली वावरणाºया या कर्मचाºयांना थोडा दिलासा मिळेल.

Web Title:  Security of Mumbaik Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.